बिलासपूर – रेल्वेप्रवासात प्रवाशांना वरण-भात, भाजी-पोळी या अन्नपदार्थांसह आता चाट म्हणजेच पाणीपुरीचा स्वाद चाखायला मिळणार आहे. आयआरसीटीसीच्या क्षेत्रिय कार्यालयाच्या दाव्यानुसार, रेल्वे विभागातर्फे चाट आणि पाणीपुरी खाऊ घालण्याची ही योजना छत्तीसगढ येथील बिलासपूरमध्ये सुरू होणार आहे. या योजनेचे चांगले निष्कर्ष मिळाल्यास दुस-या स्थानकांवर प्रस्ताव मागवून ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे. ई कॅटरिंगच्या सुविधेअंतर्गत टिफिनॉक्स या रेस्टॉरंटला चाट पुरविण्याची परवानगी दिली आहे. संचालकाकडून नियोजित किमतीबाबत परवानगी मिळाली आहे. त्याअंतर्गत सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून ४० नग पाणीपुरीची किंमत १५० रुपये आणि कुल्हड चाट १२० रुपयांना उपलब्ध होईल.
प्रवासादरम्यान प्रवाशांना अन्नपदार्थ आणि जेवण पुरविण्याची जबाबदारी आयआरसीटीसीवर आहे. ही सुविधा पेंट्रीकारासह ई-केटरिंगच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जात आहे. कोरोनाकाळात पेंट्रीकारमधून अन्न शिजविण्यावर निर्बंध घातल्याने प्रवाशांचा ई-केटरिंगककडे कल वाढला आहे. यादरम्यान टिफिनॉक्स या रेस्टॉरंटने जेवण आणि नाश्त्यात काहीतरी वेगळे द्यावे या विचारातून कुल्हड चाट उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव ठेवला. बिलासपूर यथील क्षेत्रिय कार्यालयाला हा प्रस्ताव चांगला वाटला. अन्नपदार्थांच्या गुणवत्तेची चाचणी तसेच सिंकदराबाद मुख्यालययातून मान्यता मिळण्यासाठी प्रस्तावाला परवानगी दिली. आयआरसीटीसीच्या ई-केटरिंग सुविधेवर जेवणासोबत चाट पुरविण्यास अधिकृत मान्यता देण्यात आली.
ऑनलाइनसह रेल्वेतही देऊ शकतात पैसे
प्रवाशांसाठी दिलासादायक बाब म्हणजे, पाणीपुरी किंवा चाटचे पैसे तुम्ही ऑनलाइन किंवा रोख रक्कमही देऊ शकतात. अन्नपदार्थाची गुणवत्ता नसेल किंवा आवडला नसेल तर तक्रार केल्यानंतर तुम्हाला पैसे परत मिळतील.
चाटमध्ये काय मिळणार
पाणीपुरी आणि चाटशिवाय प्रवाशांना कुल्हड भेळ, फ्राय लिट्टी-चोखा, दहीपुरी, शेवपुरी, कोलकाता क्लब कचोरी, ब्रेड बटर आणि बर्गरही ऑर्डर करू शकता येणार आहे.
बुकिंग अशी करावी
प्रवाशांना मोबाइलवर फूड ऑन ट्रॅक अॅप डाउनलोड करावे लागेल. पीएनआर क्रमांक नोंदविण्याच्या पर्यायावर जाऊन स्थानकाचे नाव निवडावे. स्थानक निवडल्यानंतर उपलब्ध हॉटेल आणि रेस्टॉरंटची यादी दिसेल. संबंधित रेस्टॉरंटचे नाव निवडल्यानंतर मेन्यू दिसेल. सलेक्ट केले की तत्काळ ओटीपी क्रमांक येईल. हा ओटीपी ऑर्डर देण्यार्या व्यक्तीला दाखवावा लागेल.