भुसावळ – कर्नाटक राज्यात महाराष्ट्र राज्यांमधून येणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी आरटी-पीसीआर निगेटिव्ह अहवाल अनिवार्य असणार आहे. कर्नाटक सरकारने महाराष्ट्र राज्यांमधून कर्नाटक राज्यामध्ये येणाऱ्या प्रवाशांना यात्रा आरंभ करण्यापूर्वी जास्तीत जास्त ७२ तासाच्या आत घेतलेल्या आरटी-पीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल किंवा कोविड १९ ची किमान एक डोसचे लसीकरण प्रमाणपत्र सोबत घेऊनच प्रवास करण्यासाचे जाहीर केले आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये प्रवास करणार्या प्रवाशांनी त्यांच्या व इतरांच्या सुरक्षिततेसाठी कोविड -१९ योग्य वर्तनाचे अनुसरण करावे असे आवाहन रेल्वेने केले आहे.