गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मोठी दुर्घटना! इर्शाळवाडीवर दरड कोसळली… ४०हून अधिक घरे डोंगराखाली… मुख्यमंत्री शिंदे घटनास्थळी… युद्धपातळीवर बचावकार्य सुरू

by India Darpan
जुलै 20, 2023 | 11:36 am
in मुख्य बातमी
0
इर्शाळवाडी

इर्शाळवाडी


रायगड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात भीषण दुर्घटना घडली आहे. खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावावर दरड कोसळली. त्यामुळे इर्शाळवाडीतील ४०हून अधिक घरे थेट डोंगराखाली गाडली गेली आहेत. यात ३०हून अधिक कुटुंबे अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. त्यात सुमारे १०० जण असल्याचे बोलले जात आहे. मोरबी धरणापासून हे गाव अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर आहे. या अपघातात अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत पाच मृतदेह बाहेर काढण्यात आले असून तीन जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह अनेक वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.

जिल्हाधिकारी योगेश महासे यांनी सांगितले की, ही घटना मध्यरात्री घडली. उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांचा समावेश असलेले पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. भूस्खलन झालेल्या ठिकाणी पोहोचण्यासाठी दोन तासांचा ट्रेक करावा लागतो, त्यामुळे मदत आणि बचाव कार्य आव्हानात्मक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही अधिकाऱ्यांना बोलावून घटनेची माहिती घेतली आणि आज सकाळी घटनास्थळी पोहोचले. पनवेल आणि नवी मुंबईतील सर्व रुग्णालयांना सूचित करण्यात आले असून बाधितांना आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सेवा देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री शिंदेंसह पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी आहेत.

#रायगड जिल्ह्यातील #खालापूर जवळील #इर्शाळगड गावात दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली.

आज पहाटे या गावाला भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच या दुर्घटनेत सुदैवाने बचावलेल्या ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. सरकार तुमच्या पाठिशी असून तुम्हाला लागेल ते सर्व सहकार्य… pic.twitter.com/z9mkpSWZ6b

— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 20, 2023

मुसळधार पावसाचा रेड अलर्ट
हवामान खात्याने गुरुवारी रायगडमध्ये मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. एनडीआरएफला मदत करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढे यावे, जेणेकरून बचाव कार्य लवकरात लवकर पूर्ण करता येईल, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. एनडीआरएफच्या दोन तुकड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. यासोबतच चार रुग्णवाहिकाही घटनास्थळी हजर आहेत. ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी आदिवासी लोक राहतात. अपघातस्थळी पाच-सहा घरे आणि एक शाळा सुखरूप बचावली. पावसामुळे १०-१२ जण शाळेतच थांबले होते, त्यामुळे त्यांचे प्राण वाचले. तर दुसरीकडे मोरबी धरणावर मासेमारीसाठी गेलेल्या पाच जणांचे प्राणही वाचले आहेत.

तसेच ही दुर्घटना भौगोलिकदृष्ट्या अत्यंत दुर्गम ठिकाणी घडल्याने हेलिकॉप्टरद्वारे रेस्क्यू ऑपरेशन करण्याच्या सूचना दिल्या. सध्या एनडीआरएफची पथके याठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन करत असून त्यांच्या कामाचा आढावा देखील यावेळी घेतला. तसेच हे मदतकार्य वेगाने व्हावे यासाठी निर्देश दिले. https://t.co/ptN5nsyFsy pic.twitter.com/SSAgBEeM8Y

— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 20, 2023

गृहमंत्री अमित शहांकडून चौकशी
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून फोनवरून या घटनेची माहिती घेतली आहे. अमित शाह यांनी ट्विटमध्ये लिहिले की, ‘महाराष्ट्रातील रायगडमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या भूस्खलनाबाबत मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोललो. एनडीआरएफच्या चार तुकड्या घटनास्थळी पोहोचल्या असून स्थानिक प्रशासनासह ते बचावकार्य करत आहेत. तिथून लोकांना बाहेर काढणे आणि जखमींवर तातडीने उपचार करणे हे आमचे प्राधान्य आहे.

खालापूर (जि. रायगड) येथील इरशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या वस्तीवर दरड कोसळली आहे. या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री @mieknathshinde हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून मदत व बचावकार्याचा आढावा घेत आहेत.

प्रचंड पाऊस आणि अवघड रस्ता यामुळे बचाव कार्य कार्यात अडथळा येत असला तरी… pic.twitter.com/ipXze5yOZu

— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 20, 2023
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मणिपूरवर पहिल्यांदाच बोलले पंतप्रधान नरेंद्र मोदी

Next Post

समृद्धी महामार्गावर आणखी एक अपघात… कार थेट संरक्षण भिंतीवर आदळली… दोन जागीच ठार

India Darpan

Next Post
IMG 20230720 WA0074 1 e1689832374465

समृद्धी महामार्गावर आणखी एक अपघात... कार थेट संरक्षण भिंतीवर आदळली... दोन जागीच ठार

ताज्या बातम्या

Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
bjp11

नाशिकमध्ये ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का….या पदाधिका-यांचा भाजपमध्ये प्रवेश

जुलै 3, 2025
Corruption Bribe Lach ACB

आठ हजाराची लाच घेणारे दोन वनपाल एसीबीच्या जाळ्यात

जुलै 3, 2025
cricket

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या विविध समित्यांवर नाशिक जिल्हा क्रिकेटचे सहा जण…

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011