रायगड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आई तुझ देऊळ फेम डान्सर सचिन ठाकूर यांची कार पुन्हा एकदा अज्ञात व्यक्तीने जाळली. रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील जसखार गावचे ते सुपुत्र आहे. ५ जानेवारी २०२३ रोजी जसखार गावात उभी असलेले फोर व्हीलर वाहन मारुती सुझूकी सिलेरियो हे वाहन अज्ञात व्यक्तीने जाळून टाकले होते. त्यावेळी या वाहनाचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले होते. त्यानंतर जवळ जवळ ७ महिन्यांनी परत तशीच सेम घटनाघडली. ७ ऑगस्टला रात्री १ वाजून २० मिनिटांनी सचिन ठाकूर यांची मारुती सुझुकी सेलेरियो कार नंबर गेल्या वेळी ज्या पद्धतीने जाळली त्याच पध्दतीने पुन्हा जाळली.
सचिन ठाकूर यांचे हे दुसऱ्यांदा वाहन जळाल्याने जसखार गावातील वाहनाच्या व नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वाहनाला लागलेली आग सचिन ठाकूर व त्यांच्या कुटुंबियांनी तसेच मित्रांनी लगेच विझविली. व पुढे होणारा मोठा अनर्थ टळला. जवळच सीएनजी टॅंक होता. व आजूबाजूला रिक्षा व इतर वाहने होती. मोठा स्फोट हाऊन इतर वाहनांना आग लागल्याची शक्यता होती. मात्र आग विझविण्यात आली. यात सुदैवाने कोणतेही जीवितहानी झाली नाही. अज्ञात व्यक्तीने वाहनाला आग लावल्याने या वेळीही सचिन ठाकूर यांना प्रचंड आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागले आहे.
पहिली घटना घडली तेव्हाही सचिन ठाकूर यांनी न्हावा शेवा पोलीस ठाण्यात जाऊन अज्ञात व्यक्तीवर गुन्हा नोंदवून पाठपुरावा केला होता. मात्र पोलिस प्रशासना कडून योग्य ते सहकार्य मिळाले नाही व आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला. वाहन जाळणारी अज्ञात व्यक्ती ही एकच असण्याची दाट शक्यता आहे. मात्र सुरवातीपासूनच पोलिसांनी योग्य ते आरोपीचा शोध न घेतल्याने अशा घटना वारंवार घडत असल्याचे सचिन ठाकूर यांनी सांगितले. सुरुवातीलाच पहिल्यांदा जेव्हा घटना घडली तेव्हा पोलीस प्रशासनाने योग्य ते शोध घेत आरोपीचा शोध घेतला असता तर आज ही वेळ आली नसती असे सचिन ठाकूर यांनी सांगितले.
आरोपीला पकडण्यासाठी त्वरित कारवाई सुरु
जसखार गावात वाहन जळल्याचे लक्षात येताच त्वरित वाहनाची पाहणी करून गुन्हा नोंदविला. आरोपी कोणीही असो. लवकरच त्याला पकडण्यात येईल. त्या अनुषंगाने पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना देखील दिलेल्या आहेत.घटनेचे गांभीर्य लक्षात घेता आरोपीला पकडण्यासाठी त्वरित कारवाई सुरु केली आहे.
– संजीव धुमाळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, न्हावा शेवा पोलीस स्टेशन.
raigad Crime dancer sachin thakur car fire burn