नाशिक – माध्यमांचे स्थान अतिशय महत्त्वाचे आहे कारण माध्यमे ही लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मानली जात असतील तर माध्यमांतून सर्व घडामोडींचा आशय अतिशय पारदर्शकपणे, योग्यपध्दतीने जाईल; राष्ट्रहितार्थ मूल्यांची रूजवणूक हीच या समाजमाध्यमांची जबाबदारी आहे असे प्रतिपादन प्रसिध्द अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केले. सामाजिक बांधिलकी जपत माध्यमांनी सजगपणे वार्तांकनास प्राधान्य द्यावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
विश्व संवाद केंद्र आणि सेंट्रल हिंदू मिलीटरी एज्युकेशन सोसायटीतर्फे स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षाचे औचित्य साधत आज डॉ.मुंजे इन्स्टिट्यूटमध्ये एकदिवसीय माध्यम संवाद परिषद झाली. “माध्यमाचा गैरवापर आणि माध्यमाची ताकद” ते याविषयावर प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते, हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. यावेळी व्यासपीठावर विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष अभय कुलकर्णी, सेंट्रल हिंदु मिलीटरी एज्युकेशन सोसायटीच्या नाशिक विभागाचे अध्यक्ष कॅप्टन श्रीपाद नरवणे, कार्यवाह हेमंत देशपांडे हे उपस्थित होते. राहुल सोलापूरकर यांनी सद्यस्थितीतील माध्यमांवर सुरु असलेले वार्तांकन व बदलणारी माध्यमे याविषयांवर वेगवेगळी उदाहरणे देत संवाद साधला. चित्रपटांनी, वृत्तपत्रांनी अर्थकारण, मनोरंजन यांना अवास्तव महत्त्व देऊन राष्ट्रीय विचारांपासून , वास्तवापासून माध्यमांना दूर नेले आहे. स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी साजरी करताना सर्व समाजमाध्यमांनी स्वत:चे पुनरुज्जीवन करण्याची गरज आहे असे त्यांनी म्हटले.
विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष अभय कुलकर्णी यांनी विश्व संवाद केंद्राच्या कार्यपध्दतीविषयी सविस्तर माहिती देत राज्यभर सुरु असलेल्या या उपक्रमाचे महत्व सांगितले. देशभरात ३० विश्व संवाद केंद्रे आहेत जी भारताची श्रेष्ठ संस्कृती, इतिहासाचे वास्तव दर्शन घडविण्यासाठी कार्यरत आहेत. मुघलांनी तलवारी ने डोकी छाटली पण ब्रिटीशांनी बुद्धी मारली. समाजासमोर चुकीची भूमिका सिद्ध करण्याचा प्रयत्न केला गेला. आतापर्यंत ठसवला गेलेल्या या चुकीच्या समजुतींना खोडून सत्य मांडण्याचे कार्य माध्यमातून केले गेले पाहिजे कारण समाजमाध्यमांमध्ये प्रचंड ताकद आहे. माध्यमांच्या या ताकदीमुळे भारताला स्वातंत्र्य मिळाले आहे , त्याच ताकदीचा वापर करून श्रेष्ठ भारतीयत्वाची जपणूक, रुजवणूक आपण केली पाहिजे असे प्रतिपादन त्यांनी केले.
परिषदेचे समारोपात बोलतांना पश्चिम महाराष्ट्र प्रांत प्रचारप्रमुख दिलीप क्षीरसागर यांनी गुंफले. ते म्हणाले की स्वराज्य ७५ या संकल्पने अंतर्गत चर्चासत्रे, वक्तृत्व, पथनाट्ये इ. माध्यमातून जनजातीचे स्वातंत्र्य आंदोलन समाजासमोर उभे रहावे सत्य इतिहास मांडला जावा यासाठी कार्यक्रम व्हायला हवेत. विश्व संवाद केंद्राच्या माध्यमातून राज्यभर अशा पद्धतीने माध्यम संवाद परिषदा त्या-त्या जिल्ह्यासाठी होत आहेत.
संस्थेतर्फे अध्यक्ष कॅप्टन श्रीपाद नरवणे व कार्यवाह हेमंत देशपांडे यांनी राहुल सोलापूकर व विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष अभय कुलकर्णी, कार्यवाह नितीन देशपांडे यांचा डॉ.मुंजे यांच्या जीवनकार्याची माहिती देणारे खंड, रामाची मुर्ती व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. हेमंत देशपांडे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. प्रास्ताविकांत त्यांनी संस्थेची वाटचाल व संस्थापक डॉ,मुंजे यांच्या सार्धशती वर्षातील कार्यक्रमाचे नियोजन सांगितले. सौ.सुप्रिया देवघरे, मंदार ओलतीकर यांनी सुत्रसंचालन केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
सतरा पुस्तकांचे प्रकाशन
स्वातंत्र्य ७५ च्या निमित्ताने स्वातंत्र्य आंदोलनातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य, स्वातंत्र्य लढा आणि संस्थाने, स्वातंत्र्यलढा चर्च आणि मिशनरी, भारतीय स्वातंत्र्य संग्राम आणि विज्ञान ,स्वराज्य ७५ इत्यादी सतरा पुस्तकांचे प्रकाशन