नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- काँग्रेसने नेते राहुल गांधी यांनी दहा दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेत निवडणूक प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थितीत करत थेट पुरावे सादर केले. निवडणूक आयोगाने भाजपशी संगनमत करून निवडणूक कशी चोरली? असे सांगत त्यांनी त्याबाबतचे पुरावे दिले. डुप्लिकेट मतदार
बनावट आणि अवैध पत्ते, एकाच पत्त्यावर मोठ्या प्रमाणात मतदार, अवैध फोटो, फॉर्म ६ चा गैरवापर याबाबत त्यांनी प्रश्न उपस्थितीत केले.
त्यानंतर या विषयांवर सत्ताधारी व विरोधी पक्ष एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करीत आहेत. त्यातच आता राहुल गांधी यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला असून या व्हिडिओची आता सर्वत्र चर्चा आहे. चोरी चोरी, चुपके चुपके…अब और नहीं, जनता जाग गई है।