नवी दिल्ली – काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी शहाणपणाचे दर्शन घडवित पश्चिम बंगालमधील त्यांच्या नियोजत सर्व रॅली आणि सभा रद्द केल्या आहेत. तर, दुसरीकडे भाजप नेते मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करीत रॅली काढत आहेत. या सर्वाचे मोठे पडसाद सोशल मिडियात उमटत आहेत. नागरिकांच्या आरोग्य हित लक्षात घेता मी रॅली आणि सभांना जाणार नसल्याचे राहुल यांनी म्हटले आहे. तर, भाजप नेते नागरिकांचा जीव धोक्यात घालून प्रचार करीत असल्याची टीका सोशल मिडियात होत आहे. राहुल गांधी यांनी शहाणपणा दाखविला आहे, भाजप नेते तो कधी दाखविणार, असा प्रश्न सोशल मिडियात विचारता जात आहे.
प्रचार रॅली रद्द करीत असल्याचे राहुल यांचे ट्विट
https://twitter.com/RahulGandhi/status/1383671033555603461
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज सकाळी काढलेल्या रॅलीचे दृश्य
https://twitter.com/ANI/status/1383690987155836932