नवी दिल्ली – कोरोना संकटात देशातील सर्व यंत्रणा कोलमडल्या आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात नाही तर जन की बात करायला हवी, असा जोरदार टोला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लगावला आहे. सध्याच्या संकटात देशाला जबाबदार नागरिकांची गरज आहे. मी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आवाहन करतो की, त्यांनी राजकारण सोडून केवळ मदतीचे कार्य हाती घ्यावे. सर्व प्रकारे मदतकार्य करुन नागरिकांचे दुःख दूर करा, अशी विनंतीही त्यांनी केली आहे. काँग्रेस हे एक कुटुंब असून त्याचा सध्या हाच धर्म आहे, असेही गांधी यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी मन की बात या कार्यक्रमाद्वारे संवाद साधला. ही बाब लक्षात घेऊन गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.
https://twitter.com/RahulGandhi/status/1386175934395555847