नवी दिल्ली – देशातील कोरोना स्थिती, त्यामुळे सर्वसामान्यांचे होणारे हाल लक्षात घेऊन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार हल्ला चढविला आहे. केंद्र सरकारने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घ्यायला हवे. म्हणूनच स्वतःची प्रसिद्धी आणि अनावश्यक प्रकल्पांवर पैसे खर्च करण्याऐवजी केंद्र सरकारने कोरोना लस, ऑक्सिजन आणि अन्य आरोग्य सुविधांवर पैसे खर्च करायला हवेत. त्याचीच नितांत गरज आहे. सर्वसामान्यांना त्यामुळेच दिलासा मिळणार आहे. आगामी काळात येणारे संकट भीषण आहे. ते ओळखूनच आपण तयारी केली पाहिजे. सध्याचे वर्तमान जे आहे ते अतिशय भयावह आहे, असेही गांधी यांनी म्हटले आहे.
https://twitter.com/RahulGandhi/status/1385805531907076097