प्रतिक पाटील
नेहरु कुटुंब हे काश्मिरी पंडित. इंदिरा गांधी यांनी फिरोज गांधी यांच्यासोबत विवाह केला. फिरोज गांधी हे फरेदून जहांगीर घांदे (Ghandy) यांचे सुपुत्र. आईचे लग्नाआधीचे नाव रतीमाई कोमीसरीएट. लग्नानंतर त्या रतीमाई फरेदून घांदे (Ghandy) झाल्या.
महात्मा गांधी यांच्या आडनावावरुन प्रेरणा घेऊन घांदे (Ghandy) कुटुंबीयांनी आपले घांदे (Ghandy) हे आडनाव बदलून गांधी (Gandhi) असे केले. मूळच्या पारशी असलेल्या पतीसोबत इंदिरा गांधी यांनी विवाह केल्याने पारशी आजोबाचा नातू हिंदू कसा? हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. मात्र पारशी धर्माच्या नियमावलीनुसार पारशी धर्म फक्त जन्माने लाभतो. तो इतर धर्मात जन्मलेल्या व्यक्तीस स्विकारता येत नाही.
कोणत्याही मुलाचे आई व वडील दोघेही जन्माने पारशी असतील तरच त्या दाम्पत्याचे मूल जन्माने पारशी होऊ शकते. त्यामुळे इंदिरा गांधी या पारशी होऊ शकल्या नाहीत. शिवाय इंदिरा गांधी यांनी हिंदू धर्मातील विवाहप्रथेनुसार देवा-ब्राह्मणांना साक्षी ठेवून हिंदू विवाह प्रथेप्रमाणे विवाह केला. त्यामुळे इंदिरा गांधी यांची दोन्ही अपत्ये राजीव गांधी व संजय गांधी हे हिंदू काश्मिरी पंडित ठरतात.
भारतीय कायद्यांचा विचार करता, आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या निकालानुसार आंतरधर्मीय किंवा आंतरजातीय विवाहानंतर देखील अपत्याला आपल्या आईच्या माहेरची जात-धर्म किंवा आडनाव वापरता येते. त्यानुसारही, इंदिरा गांधी यांची दोन्ही अपत्ये राजीव गांधी व संजय गांधी हे हिंदू काश्मिरी पंडित ठरतात.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे इंदिरा गांधी यांच्या कनिष्ठ सुनबाई मनेका गांधी या जन्माने शीख आहेत. संजय गांधी यांच्या मृत्यूनंतर संपत्ती वाटपावरुन मनेका गांधी फिरोज गांधी या पारशी पित्याची व इंदिरा या हिंदू मातेची अपत्ये हिंदू आहेत या आधारावर हिंदू अविभाजित कुटुंब कायद्यानुसार (The Hindu Succession Act / हिंदू वारसाहक्क अधिनियम) संपत्ती वाटप करण्याचा ऐतिहासिक निर्णय दिला. त्यानुसार, इंदिरा गांधी यांची दोन्ही अपत्ये राजीव गांधी व संजय गांधी हे हिंदू काश्मिरी पंडित ठरतात.
राजीव गांधी, संजय गांधी या दोघांनीही आंतरधर्मीय विवाह केले. मात्र दोघांचेही विवाह हिंदू धर्मातील विवाहप्रथेनुसार देवा-ब्राह्मणांना साक्षी ठेवून विवाह केले. इंदिरा गांधी यांच्या दोन्ही सूना सोनिया गांधी व मनेका गांधी यांनी हिंदू कुलाचार पाळले आहेत. राजीव व संजय या हिंदू पित्यांचे दोन्ही मुलगे राहुल गांधी (काँग्रेस) व वरुण गांधी (भाजपा) हे दोघेही हिंदू असून काश्मिरी पंडित आहेत.