नवी दिल्ली – काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी हे कोरोना बाधित झाले आहेत. तशी माहिती त्यांनीच ट्वीटरद्वारे दिली आहे. अत्यंत सौम्य लक्षणे जाणवत असल्याने मी चाचणी केली आणि ती पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. राहुल गांधी यांनी कालच स्पष्ट केले होते की, कोरोना प्रादुर्भावाच्या प्रार्श्वभूमीवर ते पश्चिम बंगालमध्ये रॅली आणि सभा घेणार नाहीत. नागरिकांचा जीव मी धोक्यात आणू इच्छित नाही. तसेच, अन्य राजकीय पक्ष आणि नेत्यांनीही त्याचा विचार करावा, असे आवाहनही त्यांनी केले होते.
https://twitter.com/RahulGandhi/status/1384442319638867969