इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बिहारमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी व तेजस्वी यादव यांची मोटरसायकल रॅली निघाली. पूर्णिया जिल्हयातील खुश्कीबाग येथून ही रॅली सुरु झाली. येथे राहुल गांधी यांनी रस्त्यावर बाईक चालवली. गेल्या काही दिवसांपासून बिहारमध्ये वोटर अधिकार यात्रा सुरु आहे. १७ ऑगस्ट पासून ही यात्रा सासारामवरुन सुर झाली. १६ दिवसात ही यात्रा २० हून अधिक जिल्ह्यात जाणार आहे. १३०० किलोमीटरहून अधिक प्रवास या यात्रेनिमित्त हे नेते करणार आहे.
या यात्रेबाबत राहुल गांधी यांनी सांगितले की, गेल्या दोन यात्रांमध्ये नव्हत्या अशा एका अतिशय वेगळ्या गोष्टी समोर येत आहेत. या यात्रेत मुले येत आहेत. ते ‘वोट चोर गद्दी सोड’ म्हणत आहेत. हे प्रौढ नाहीत. ते लहान आहेत. आता, सहा वर्षांच्या एका लहान मुलाला कळले आहे. आणि फक्त एक नाही, हजारो. आता, निवडणूक आयोगाने जाऊन या मुलांशी बोलले पाहिजे. त्यांना कळेल… बिहारची मुले राजकीयदृष्ट्या सक्रिय झाली आहेत.
या रॅलीत मोठ्या संख्येने नागरिक सामील झाले आहे. आमच्यात खूप चांगले ट्युनिंग निर्माण झाले आहे, सर्व पक्ष एकत्र काम करत आहेत, परस्पर आदर आहे, वैचारिकदृष्ट्या आम्ही एक आहोत, राजकीयदृष्ट्या आम्ही एक आहोत, खूप चांगले परिणाम मिळतील, परंतु मतांची चोरी थांबवली पाहिजे.