इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
कोल्हापूरमध्ये राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा स्वीकारताना आपसूकच पादत्राणे बाजूला काढतानाचं चित्र माझ्यासह तमाम शिवशंभु भक्तांना अनामिक समाधान देणारं असल्याचे सांगत अभिनेता व खासदार डॅा. अमोल कोल्हे यांनी कौतुक केले.
यावेळी ते म्हणाले की, एक कलाकार व शिवशंभू भक्त या दोन्ही भूमिका निभावताना माझ्याकडूनही वैयक्तिक व सामाजिक जीवनात काही पथ्ये आपसूकच पाळली गेली आहेत. छत्रपतींची प्रतिमा स्वीकारताना पादत्राणे काढून वंदन करणे, छत्रपतींचा पेहराव नसताना जिरेटोप न घालणे, पेहराव नसताना महाराजांचे संवाद न म्हणणे, जिरेटोप व कवड्यांची माळ घालताना नतमस्तक होणे… या गोष्टी कुणी सांगितल्या नाहीत किंवा मीही कधी आवर्जून ठरवलं नाही.. हे सगळं आपसुकच घडलं.
आज राहुल गांधी यांची कृती पाहून ‘मनात खरी श्रद्धा असेल तर काही कृती आपल्याकडून आपसूकच घडतात’ ही भावना दृढ झाली.