गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी…आज काँग्रेसचे राज्यभर आंदोलन

by India Darpan
सप्टेंबर 13, 2024 | 1:08 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
Untitled 45

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या भाजपाचा माजी आमदार तरविंदरसिंह मारवाह याचे विधान अत्यंत आक्षेपार्ह व भडकाऊ आहे. गांधी कुटुंबाने देशासाठी तीन बलिदान दिली आहेत. गांधी कुटुंबाच्या जीवाला आजही धोका आहे, तरीही राहुल गांधी जीवाची पर्वा न करता सर्वसामान्य जनतेत मिसळतात. राहुल गांधी घाबरत नाहीत म्हणून आता त्यांना संपवण्याचीच भाषा केली जात आहे. भाजपाच्या नफरतच्या फॅक्टरीत तयार झालेल्या तरविंदरसिंह मारवाहच्या विधानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह व भाजपने भुमिका स्पष्ट करावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

यावेळी ते म्हणाले की, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या तरविंदरसिंह मारवाह व भाजपाविरोधात काँग्रेस पक्षाचे राज्यभर आंदोलन. शुक्रवारी सकाळी ११.०० वाजता, प्रत्येक जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पटोले म्हणाले की, काल आंदोलना दरम्यान मारवाह यांनी राहुल गांधी, बाज आ जा नहीं तो आनेवाले टाईम में तेरा भी वही हाल होता जो तेरी दादी का हुआ’ ही धमकी दिल्ली भाजपा नेते आणि माजी आमदार तरविंदर सिंह मारवाह यांनी दिली. सत्ताधारी पक्षाचा नेता चक्क विरोधी पक्षनेत्याला जीवे मारण्याची धमकी देत आहे. हीच का तुमची लोकशाही? हेच का तुमचं देशप्रेम? ज्या व्यक्तीच्या कुटुंबाचं देशाच्या स्वातंत्र्यात मोठं योगदान राहिलं आहे, अशा गांधी कुटुंबातल्या व्यक्तीला, विद्यमान विरोधी पक्षनेत्याला थेट संपवण्याची भाषा कशी वापरली जाते असा प्रश्नही त्यांनी उपस्थितीत केला.

जिथे आमचे नेते प्रेमाची गोष्ट करतात तिथे तुमचे नेते द्वेषाशिवाय काहीच बोलत नाही. यावर आता तुम्ही गप्प का? आणि तुमचा भारतीय जनता पक्ष झोपेचं सोंग घेऊन का बसला आहे.? या गंभीर घटनेवर आपण मौन बाळगू शकत नाही. द्वेषाचं विष पसरवणाऱ्या तुमच्या या नेत्यावर तुम्हाला कारवाई करावीच लागेल.मोदीजी, तुम्हाला देशात शांतता प्रस्थापित करायची असेल तर अशा खुले आम हत्या करण्याची धमकी देणाऱ्या गुंडांना वेळीच आवरा! असेही पटोले यांनी सांगितले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मी राजीनामा देण्यास तयार…ममता बॅनर्जीच्या वक्तव्याने राजकीय वर्तूळात खळबळ

Next Post

मनमाड – नगर राज्य मार्गावर हुंडाई कारचा विचित्र अपघात…दोन जण ठार, एक जण गंभीर जखमी

Next Post
Screenshot 20240913 093155 WhatsApp

मनमाड - नगर राज्य मार्गावर हुंडाई कारचा विचित्र अपघात…दोन जण ठार, एक जण गंभीर जखमी

ताज्या बातम्या

Untitled 60

ठाकरे गटाला वर्धापन दिनीच मोठा धक्का….मुंबईतील हे माजी नगरसेवक,पदाधिकारी शिंदे गटात

जून 19, 2025
WhatsApp Image 2025 06 19 at 4.03.25 PM 1068x1424 1 e1750339743397

नागपूर येथील तब्बल ४२६ झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांना त्यांचे हक्काचे घर

जून 19, 2025
Untitled 59

नाशिकमध्ये गोदीवरी नदीला पूर, नदीपात्रात कार अडकली, भांडी बाजार परिसरात दुकानात पाणी

जून 19, 2025
crime1

वाहन पार्किंगच्या वादातून रिक्षाचालकावर टोळक्याने केला हल्ला…गोदाघाटावरील घटना

जून 19, 2025
image001LF3A

फ्रान्सच्या इंटरनॅशनल अ‍ॅनिमेशन फेस्टिव्हलमध्ये भारतीय ‘देसी ऊन’ चित्रपटाने मिळवले यश….

जून 19, 2025
jilha parishad

रणधुमाळी….नाशिक जिल्हा परिषदेत भाजपासमोर मागील कामगिरी टिकवून दाखवण्याचेच आव्हान

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011