नवी दिल्ली – काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ब्रेकफास्ट पार्टी दिल्लीत आज चांगलीच चर्चेत राहिली. कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये झालेल्या या पार्टीत १४ प्रमुख विरोधी पक्षांचे नेते उपस्थिती होते. या पार्टाने राहुल गांधी यांनी १०० हून अधिक खासदारांशी चर्चा केली. या पार्टीत शिवसेना, राष्ट्रवादी, तृणमल काँग्रेस, राजद यापक्षाचे नेते उपस्थितीत होते. तर बसपा व आम आदमी पार्टीचे नेते सामील झाले नव्हते. या पार्टीत महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, खा. सुप्रिया सुळे, शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत हे उपस्थितीत होते. केंद्र सरकारला संसदेत घेरण्याची तयारीसाठी ही पार्टी होती. शेतकरी आंदोलन आणि पेगॅसस प्रकरणी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. या मुद्द्यावरुन केंद्र सरकारने संसदेत चर्चा करावी अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे. या पार्टीनंतर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सायकल रॅली सुध्दा केली.
https://twitter.com/RahulGandhi/status/1422435731021123607?s=20