नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- काँग्रेस नेते राहुल गांधी यांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त केल्याप्रकरणी नाशिक कोर्टात प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. या प्रकरणातील याचिकाकर्ते अॅड. मनोज पिंगळे यांनी ही माहिती दिली. ही सुनावणी मे महिन्यात होणार आहे. राहुल गांधी यांनी ऑनलाईन हजर न राहता प्रत्यक्ष हजर राहण्याचे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.
भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर सावरकर प्रेमींनी नाशिकच्या सरकारवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आज या प्रकरणावर सुनावणी झाली. त्यात न्यायालयाने राहुल गांधींना प्रत्यक्ष हजर राहून आपली बाजू मांडावी असे आदेश दिले आहेत.