इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
निळा टी शर्ट परिधान करुन लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी परभणीतील दिवंगत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाची आज भेट घेतली. या भेटीनतंर त्यांनी थेट ही हत्या पोलिसांनीच केली असा आरोप केला. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी पोलिसांनी पाठीशी घालण्यासाठी खोटं वक्तव्य केले असल्याचा आरोपही त्यांनी केला. संविधनाचं रक्षण करणा-या सोमनाथची हत्या करणा-यावर कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाच्या मृत्यूनंतर राहुल गांधी यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. या प्रकरणात नेमकं काय झालं. आतापर्यंत काय कारवाई करण्यात आली याची माहिती यावेळी त्यांनी घेतली. यावेळी राहुल गांधी यांच्यासोबत राज्यातील प्रमुख नेते उपस्थित होते.
न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा मारहाणीच्या धक्क्यामुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. त्यानंतर या प्रकरणी दोषी अधिका-यांवर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी ही भेट घेत थेट पोलिसांवरच आरोप केला.