शनिवार, ऑगस्ट 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

मोदी यांना स्मृतिभंशाचा गंभीर आजार…राहुल गांधी यांची खरपूस टीका

by Gautam Sancheti
नोव्हेंबर 16, 2024 | 11:17 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
Rahul Gandhi e1709404844744

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अमरावतीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्मृतिभ्रंशाचा गंभीर आजार जडल्याची टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमरावती येथील प्रचारसभेत केली. स्मृतिभ्रंशाचा आजार झाल्याने ते आरक्षण व जातनिहाय जनगणनेच्या मुद्यावरून माझ्यावर टीका करत आहेत, असे ते म्हणाले. राहुल यांनी यासंबंधी अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष जो बायडेन यांचा दाखला दिला. बायडेन अनेकदा आपल्या भाषणात महत्त्वाचे मुद्दे विसरत होते, असे ते त्यांचा नामोल्लेख टाळत म्हणाले.

मराठा आरक्षण, जातनिहाय जनगणना, बेरोजगारी, शेतकरी समस्या, अर्थव्यवस्था, समाजातील वाढता जातीयवाद, धार्मिक ध्रुवीकरण आदी विविध मुद्यांवरून त्यांनी मोदी व भाजपवर निशाणा साधला. राहुल म्हणाले, की पंतप्रधान मोदी आता माझा आरक्षणाला विरोध असल्याचा आरोप करत आहेत. माझी बहीण मला सांगत होती, की मोदी सध्या जे आपण बोलत आहोत, तेच बोलत आहेत. कदाचित त्यांना स्मृतिभ्रंशाचा आजार झाला असावा. त्यांची गत अमेरिकेच्या अध्यक्षांसारखी झाली आहे. त्यांनाही वेळोवेळी मला हे नाही तर ते बोलायचे आहे असे सांगावे लागत होते. तिथे युक्रेनचे अध्यक्ष आले असता ते रशियाचे अध्यक्ष पुतीन आल्याचे सांगत होते. त्यानंतर त्यांच्या मागे उभे असलेल्या लोकांना त्यांना हे पुतीन नव्हे, तर युक्रेनचे अध्यक्ष असल्याचे सांगावे लागत होते. त्यांना स्मृतिभ्रंश झाला होता. तसाच स्मृतिभ्रंश आपल्या पंतप्रधानांचा होत आहे.

मी म्हणतो भाजप संविधानावर हल्ला करत आहे, तर ते म्हणतात काँग्रेस संविधानावर हल्ला करत आहे. मी प्रत्येक भाषणात विशेषतः मागील वर्षभरापासून भाजपवर संविधानावर हल्ला करण्याची टीका करत आहे. आता मोदी हेच आरोप आमच्यावर करत आहेत. मी प्रत्येक भाषणात आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवण्याची मागणी करीत आहे. लोकसभेतही मी मोदी यांच्यापुढे हे सांगितले; पण मोदी स्मृतिभ्रंशामुळे माझ्यावरच आरक्षणाला विरोध असल्याचा आरोप करत आहेत. मी मोदी यांच्याकडे जातनिहाय जनगणनेची मागणी केली होती; पण कदाचित मोदी आपल्या पुढल्या भाषणात माझा जातनिहाय जनगणनेला विरोध असल्याचा आरोप करतील, असे त्यांनी सांगितले. मी वर्षभरापासून आरक्षण, जातनिहाय जनगणना आदी मुद्यांवर बोलत आहेत, पण माध्यमे ते दाखवत नाहीत. कारण ते उद्योगपतींची, सरकारची गुलाम आहेत; पण आज माझ्या आरोपानंतर ते मोदींची स्मृती जबरदस्त आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतील. मोदी एकदा ऐकले, तर ७० वर्षे विसरत नाहीत, असे ते म्हणतील. एवढेच नाही तर त्याच्यासोबत ते मोदी यांनी तलावात जाऊन मगर पकडल्याची कथाही जोडतील; पण मोदी जेव्हा गंगेत जातील, तेव्हा त्यांना पोहणे येत असल्याचे वाटत नाही, अशी टीका त्यांनी केली.

आमचा लढा संविधानासाठी आहे. काँग्रेस महात्मा गांधी, महात्मा फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांसाठी आहे. हे सर्वजण आज असते, तर त्यांनी जातनिहाय जनगणनेचा आग्रह धरला असता; पण मोदी यांची हे करण्याची इच्छा नाही. कारण मागासवर्ग, आदिवासी, दलित यांची संख्या ९० टक्क्यांच्या आसपास आहे; पण त्यानंतरही त्यांचा सरकारमध्ये नगण्य वाटा आहे. त्यांच्यावर इतर लोक राज्य करत आहेत. मी गरिबांच्या मालमत्तेची त्यांच्या जमिनीचे संरक्षण करतो. त्यामुळे या सरकारने माझी प्रतिमा मलिन करण्यासाठी माझा अपप्रचार करण्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च केले. हे का केले तर मी धनदांडग्यांचा नव्हे, तर गरिबांचा कैवार घेतो म्हणून केले गेले, असा आरोप त्यांनी केला. मोदी यांनी रोजगाराची व्यवस्था संपुष्टात आणली आहे. त्यामुळे समाजात द्वेष वाढत आहे. आज देशातील कोणत्याही राज्यातील तरुणांना रोजगार मिळत नाही. कारण उद्योगपती आपल्या बाजारात चीनचा माल विकत आहेत. देशातील सर्वच कारखाने बंद झाले आहेत. छोटे व्यवसाय बंद झाले आहेत. नोटाबंदी ही योजना नव्हती तर शस्त्र होती. जीएसटी शेतकऱ्यांना मारण्याची पद्धत आहे, छोट्या व्यापाऱ्यांना संपवण्याचे कारस्थान आहे. अदानी व अंबानी यांचा मार्ग मोकळा करण्याची पद्धती आहे. यामुळे देशाची सर्वच संपत्ती २०-२५ लोकांच्या हातात गेली. देशाला रोजगार देणारे शेतकरी, छोटे उद्योगपती देशोधडीला लागले. यामुळे देशात द्वेष पसरत आहे; पण मोदी याकडे दुर्लक्ष करत आहेत. ते केवळ ‘मन की बात’ करण्यात व्यस्त आहेत, अशी टीका राहुल यांनी केली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मौलानांच्या आवाहनापासून काँग्रेसने केले स्वतःला दूर

Next Post

‘वंचित’सत्तेसोबत जाणार…प्रकाश आंबेडकर यांचे सूतोवाच

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
vanchit

‘वंचित’सत्तेसोबत जाणार…प्रकाश आंबेडकर यांचे सूतोवाच

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011