सोमवार, जून 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

फडणवीस यांच्याकडून आंबेडकरांचा अवमान…शहरी नक्षलवादावरच्या टीकेला राहुल गांधी यांचे उत्तर

by India Darpan
नोव्हेंबर 9, 2024 | 12:17 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
Rahul Gandhi

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः राहुल गांधी लाल रंगाचे संविधान दाखवून शहरी नक्षलवादाला प्रोत्साहन देतात. देशात एकप्रकारे अराजकता परसवण्याचे काम राहुल आणि ‘इंडिया’ आघाडीचे नेते करत आहेत, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यांच्या टीकेला राहुल यांनी ‘एक्स’ या समाज माध्यमावर पोस्ट करत उत्तर दिले. महाराष्ट्रातील भाजपच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या मते, बाबासाहेबांचे संविधान दाखवून जात जनगणनेसाठी आवाज उठवणे, ही नक्षलवादी कल्पना आहे. भाजपची ही विचारसरणी म्हणजे संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान आहे, असे राहुल म्हणाले.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने संविधानासाठी लढून महाविकास आघाडीला मोठा विजय मिळवून दिला होता. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता हा बाबासाहेबांचा अपमान कधीही सहन करणार नाही. लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही ते काँग्रेस आणि महाविकास आघाडीला समर्थन देतील आणि आपल्या संविधानावरील प्रत्येक हल्ल्याला पूर्ण ताकदीने उत्तर देऊन त्याचे रक्षण करतील, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

राहुल यांच्या नागपूरमधील संविधान सभेबाबत बोलताना फडणवीस यांनी महाविकास आघाडीला लक्ष्य केले होते. ‘भारत जोडो’ हा समूह तयार करण्यात आला आहे. या समूहामध्ये अनेक संघटना अतिशय डाव्या विचारांच्या आहेत. त्यांच्या कामाची पद्धत, ध्येय धोरणे ही अराजक पसरवणारी यंत्रणा आहे. एकीकडे राहुल एक पुस्तक आपल्याला दाखवतात. संविधानाचा सन्मानच केला पाहिजे; पण लाल संविधानच का? कोणाला तुम्ही इशारा देताय? लाल पुस्तक दाखवून कोणाला इशारा देताय? संविधानाचा अर्थ असतो ऑर्डर. तुम्ही अराजक पसरवत आहात,’ असे फडणवीस म्हणाले होते. संविधान आणि ‘भारत जोडो’ याच्या नावाखाली अराजकता पसरवणाऱ्यांना एकत्र करून समाजात द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. शहरी नक्षलवादाचा हा प्रयत्न आहे. शहरी नक्षलवादाचा हाच अर्थ आहे की लोकांची मने कलुषित करायची. त्यांच्यामध्ये अराजकतेचे एक रोपण करायचे, जेणेकरून देशातील संस्था, यंत्रणा यावरून त्यांचा विश्वास उडेल. यामुळे देशाच्या एकतेला आणि एकात्मकतेला धोका निर्माण होईल, अशी टीकाही त्यांनी केली होती.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री फडणवीस, शाह यांचे सूतोवाच; शरद पवार यांना केले टार्गेट

Next Post

बदलापूरच्या ‘त्या’ शाळेत ब्लू फिल्म…पटोले यांचा गंभीर आरोप

India Darpan

Next Post
Nana Patole1

बदलापूरच्या ‘त्या’ शाळेत ब्लू फिल्म…पटोले यांचा गंभीर आरोप

ताज्या बातम्या

Untitled 75

नाशकात ही कंपनी करणार कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक…

जून 23, 2025
om birla arrival 1024x576 1

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे मुंबईत आगमन…असे आहे कार्यक्रम

जून 23, 2025
Screenshot 20250623 070829 Collage Maker GridArt 1

पंढरपूर सायकल वारी… ५००० हून अधिक सायकलस्वारांचा सहभाग, १० लाख किलोमीटरहून अधिक प्रवास

जून 23, 2025
Hydroponic4U163

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ११.८८ कोटी रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

जून 23, 2025
Gold1JIB2 e1750641367756

सोन्याच्या तस्करीप्रकरणी दोन विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक….

जून 23, 2025
IMG 20250622 WA0424 1

नाशिक रिंगरोडला मंजुरी, त्र्यंबक सहापदरी, द्वारका सर्कलचा दोन टप्यात विकास….मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत झाले हे निर्णय

जून 23, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011