गुरूवार, सप्टेंबर 11, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

कौतुकास्पद! महसूली निकाल थेट ‘क्यूआरकोड’ द्वारे! राहत्याच्या मंडळाधिकाऱ्याचा भन्नाट उपक्रम

by Gautam Sancheti
ऑक्टोबर 16, 2022 | 12:43 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
IMG 20221016 WA0015

 

शिर्डी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महसूल विभागामार्फत दिले जाणारे अर्धन्यायीक निर्णय प्रथमच ‘क्यूआर कोड’च्या माध्यमातून देण्याचा नावीन्यपूर्ण उपक्रम राहाता मंडळ कार्यालयाने राबविला आहे. मंडळ अधिकारी डॉ.मोहसिन शेख यांनी ही कल्पक संकल्पना प्रत्यक्षात उतरविली असून राज्यातील महसूल विभागासाठी हा निर्णय दिशादर्शक ठरणार आहे. शासकीय कामात अधिक पारदर्शकता व तत्परता ‘क्यूआर कोड’ निर्णयामुळे येणार असून नागरिकांना घरबसल्या निकाल मिळणार आहे. राहाता मंडळ अधिकारी कार्यालयाचा हा उपक्रम स्तुत्य व वाखाणण्याजोगा असल्याची प्रतिक्रिया वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील रणजित डिसले या शिक्षकांने ‘क्यूआर कोड’चा वापर प्रथम पाठ्यपुस्तकांमध्ये केला. या कल्पकतेची शासनाने दखल घेत सर्वच पाठ्यपुस्तकांमध्ये ‘क्यूआर कोड’ वापरण्यास सुरूवात केली. अशाच प्रकारची कल्पकता व नावीन्यता डॉ.मोहसिन शेख यांनी महसूल विभागात प्रथमच राबविण्यास सुरूवात केली आहे. महसूल विभागामार्फ़त विविध अर्धन्यायिक प्रकरणात निर्णय दिले जातात व सदर आदेश https://eqjcourts.gov.in या संकेतस्थळावर देखील उपलब्ध असतात. मात्र, या संकेतस्थळावरील निकालपत्र प्राप्त करून घेण्याची प्रक्रिया किचकट व त्यावरील स्कॅनसाठी कमी साईजचे असलेले बंधन यामुळे निकालपत्र तितके स्पष्ट दिसत नाही. या सर्व बाबींवर मात करण्यासाठी राहाता मंडळ अधिकारी कार्यालयात अर्धन्यायिक प्रकरणासाठी ‘क्यूआर कोड’ (QR code) ही संकल्पना राबविण्यात आली.

अर्जदार सामनेवाले यांना केवळ निकालाची समज देणेबाबत कायद्यात व शासन निर्णयात तरतूद असल्याने निकालाची समज देताना त्या पानावर हे ‘क्यूआर कोड’ असणार आहे. त्यामुळे सहजासहजी हे निकालपत्र स्कॅन करून प्राप्त करता येणार आहे. तसेच निकालपत्र हे डिजिटल सहीचे असल्याने पुन्हा नक्कल काढण्याची आवश्यकता नाही. यामुळे अर्जदार, सामनेवाले, हितसंबंधित व्यक्ती व विधिज्ञ यांना मोठा फायदा होणार आहे. यामुळे शासकीय कामात अधिक पारदर्शकता येऊन तत्परता येणार आहे. अशी माहिती मंडळ अधिकारी डॉ.मोहसिन शेख यांनी दिली.

नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त रमेश काळे म्हणाले की, ‘‘विधिज्ञ आणि पक्षकारांना ‘क्यूआर कोड’ उपक्रमाचा फायदा होईल. मालमत्ता सर्च रिपोर्ट, प्रमाणित प्रत मिळण्यास होणारा वेळेचा अपव्यय यामुळे टळणार आहे. प्रशासकीय पारदर्शकता निर्माण होण्यास मदत होणार आहे.’’

‘‘भारतीय पुरावा कायदा १८७२ च्या कलम ८५ सी व ६५ अन्वये व माहिती तंत्रज्ञान कायदा २००२ च्या कलम ४ अन्वये डिजिटल स्वाक्षरी असलेला अभिलेख पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो. त्यामुळे वेगळी प्रमाणित प्रत मागण्याची आवश्यकता नाही. अशी प्रत पुरावा कायद्याच्या कलम ७६ अन्वयेही प्रमाणित प्रत म्हणून ग्राह्य धरतात. या उपक्रमामुळे निकालाची प्रत सहज व सुस्पष्ट उपलब्ध होत आहे. वापर करण्याची पद्धत ही अंत्यंत साधी व सोपी आहे.’’ अशी प्रतिक्रिया मुंबईचे मुद्रांक जिल्हाधिकारी किरण पाणबुडे यांनी दिली आहे.

अत्यंत स्तुत्य आणि अत्याधुनिक प्रकल्प असल्याची प्रतिक्रिया उपजिल्हाधिकारी डॉ.संजय कुंडेटकर यांनी दिली आहे. राहाता तहसीलदार कुंदन हिरे म्हणाले, पक्षकारांच्या वेळेची बचत होण्याच्या दृष्टीने उचललेले सकारात्मक पाऊल असून अपील दाखल करण्यास विलंब टळणार आहे. शासनाकडून अधिकृतपणे अशी कार्यपद्धती सर्वस्तरावर शक्य तितक्या लवकर बंधनकारक करण्यात यावी. अशी अपेक्षा सेवानिवृत्त महसूल उपायुक्त प्रल्हाद कचरे यांनी व्यक्त केली आहे.

‘क्यूआर कोड’चा वापर कसा करावा?
मोबाईलमध्ये प्लेस्टोर किंवा ॲपस्टोर मधून ‘क्यूआर कोड’ स्कॅन ॲप डाऊनलोड करून घ्यावे व अँप मधील स्कॅन पर्याय वापर करून ‘क्यूआर कोड’ स्कॅन करावा. त्यांनतर ओपन वेबसाईट वर क्लिक केल्यास डिजिटल सहीचा संपूर्ण निकाल आपणाला मोबाईलमध्ये पीडीएफ स्वरूपात प्राप्त होईल. आपण त्याची प्रिंट काढू शकता व तो निकाल इतरांना पाठवू ही शकता.

Rahata Circle Officer Initiative Revenue Orders QR Code

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

एमआयएम नेत्याचे हिंदूंविषयी वादग्रस्त वक्तव्य; अखेर गुन्हा दाखल (बघा, ते काय म्हणाले याचा व्हिडिओ)

Next Post

अंधेरी पोटनिवडणुकीत राज ठाकरेंची एण्ट्री; फडणवीसांना पत्र लिहीत म्हणाले की, ‘माझं मन मला सांगतं…’

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी नवीन कामे व प्रवास टाळावे, जाणून घ्या, गुरुवार, ११ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 10, 2025
IMG 20250910 WA0350 1
स्थानिक बातम्या

शिलापूर येथील सीपीआरआयच्या प्रादेशिक तपासणी प्रयोगशाळेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

सप्टेंबर 10, 2025
Untitled 9
आत्महत्या

नर्तिकेसाठी वेडा झालेल्या उपसरंपचाची आत्महत्या…नातेवाईकांचा घातपाताचा आरोप

सप्टेंबर 10, 2025
WhatsApp Image 2025 09 09 at 10.51.24 AM 1
स्थानिक बातम्या

नाशिकमध्ये या फाऊंडेनशतर्फे बंगाल फाईल्स चित्रपटाचे दोन शोज….८०० जणांची उपस्थिती

सप्टेंबर 10, 2025
rain1
संमिश्र वार्ता

राज्यात अशी असेल पावसाची स्थिती…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

सप्टेंबर 10, 2025
crime 1111
क्राईम डायरी

मोटारसायकल चोरीचे सत्र सुरूच….वेगवेगळया भागात पार्क केलेल्या चार मोटारसायकली चोरीला

सप्टेंबर 10, 2025
crime 88
क्राईम डायरी

घरफोडीची मालिका सुरूच….वेगवेगळया भागात झालेल्या तीन घरफोडींमध्ये चार लाखाचा ऐवज लंपास

सप्टेंबर 10, 2025
crime11
क्राईम डायरी

फ्रॉडची ९ लाख ८० हजाराची रक्कम मुळ मालकास परत…नाशिकच्या सायबर शाखेस यश

सप्टेंबर 10, 2025
Next Post
raj thackeray devendra fadanvis e1755756036490

अंधेरी पोटनिवडणुकीत राज ठाकरेंची एण्ट्री; फडणवीसांना पत्र लिहीत म्हणाले की, 'माझं मन मला सांगतं...'

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011