नवी दिल्ली – लढाऊ विमान राफेलचे भूत पुन्हा बाटलीतून बाहेर आल्याचे दिसून येत आहे. यावेळी मात्र भारतात नाही तर फ्रान्समध्ये राफेलसंदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. भारत आणि फ्रान्स यांच्यात या विमानाच्या खरेदी-विक्रीचे करार झाला आहे. या करारावरुन भारतात २०१९च्या लोकसभा निवडणुकीत आरोपांची राळ उडाली होती. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयातही गेले होते. मात्र, त्यानंतर हे वादळ शमले. आता मात्र फ्रान्समध्ये राफेल प्रकरण तापले आहे. तेथे झालेल्या विविध आरोपांच्या चौकशीसाठी न्यायमूर्तींची चौकशी करण्यात आली आहे. या तपासामध्ये फ्रान्सचे विद्यमान आणि माजी राष्ट्राध्यक्षांचीही चौकशी होऊ शकते, असे सांगितले जात आहे. त्यामुळे राफेल प्रकरण पुन्हा तापण्याची चिन्हे आहेत. फ्रान्समधील चौकशीचे पडसाद भारतातही उमटणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.