नवी दिल्ली – गुजरातमध्ये भाजपने खांदेपालट करत विजय रुपाणी यांच्याकडून राजीनामा घेऊन भूपेंद्र पटेल यांना नवे मुख्यमंत्री केले. रुपाणी यांचा अलोकप्रिय चेहरा हेच त्यांना हटविण्याचे मुख्य कारण असल्याचे बोलले जात आहेत. मात्र असे बोलणा-या लोकांना त्यांची मुलगी राधिका यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. एक फेसबुक पोस्ट लिहून त्यांनी अनेक गोष्टींचा उलगडा केला आहे. राधिका फेसबुक पोस्टमध्ये लिहितात, २००२ मध्ये अक्षरधाम मंदिरावर हल्ला झाल्यानंतर मोदीजींच्या आधी माझे वडील घटनास्थळी पोहोचले होते. “एका मुलीच्या नजरेतून विजय रुपाणी” (एक बेटी के नजर से विजय रूपाणी), असे फेसबुक पोस्टचे शीर्षक आहे. तौक्ते चक्रीवादळासारख्या मोठ्या संकटात माझे वडील पहाटे २.३० वाजेपर्यंत जागून लोकांसाठी व्यवस्था करत होते. फोनवरच तासंतास त्यांचे काम सुरू असे. अनेक लोकांसाठी माझ्या वडिलांचा कार्यकाल एक कार्यकर्ताच्या रूपात सुरू होऊन अनेक राजकीय पदांच्या माध्यमातून मुख्यमंत्रीपदावर पोहोचला. परंतु माझ्या मते, माझ्या वडिलांचा कार्यकाल १९७९ रोजी मोरबी येथे आलेला पूर, अमरेलीमध्ये ढगफुटी झाल्याची घटना, कच्छ भूकंप, स्वामीनारायण मंदिरावर दहशतवादी हल्ला, गोधराची घटना, बनासकांठाच्या पूरपरिस्थितीपासून सुरू झाला. तौक्त चक्रवादळ आणि कोविड काळात माझ्या वडिलांनी पूर्ण जीव लावून काम केले.
राधिका यांनी लहानपणाबाबत सांगितले, की माझ्या वडिलांनी कधीही खासगी काम पाहिलेले नाही. त्यांना जी जबाबदारी मिळाली, ती त्यांनी निभावली. कच्छला भूकंप झाल्यावर ते सर्वात आधी घटनास्थळी पोहोचले होते. लहानपणी आई-वडिलांनी आम्हाला कधीही फिरायला नेले नाही. ते आम्हाला चित्रपट थिएटरमध्ये नव्हे, तर एखाद्या कार्यकर्त्याच्या घरी घेऊन जात होते. स्वामी नारायण अक्षरधाम मंदिरावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तिथे नरेंद्र मोदी यांच्या आधी ते पोहोचले होते. माझे वडील संवेदनशील होतेच पण वेळेप्रसंगी कठोरही झाले.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=4682376945114109&id=100000255483811