नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – काम करुनही गेल्या तीन वर्षापासून बिलाची रक्कम मिळत नसल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे ठेकेदार आक्रमक झाले. ५०० कोटींची बिले थकीत असूनही शासनाने केवळ ४५ कोटी रुपये पाठवल्याचा दावा करत त्यांनी त्र्यंबक रोडवरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य कार्यालयाच्या गेटसमोरच ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनात जवळपास २०० ठेकेदार होते. त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता औटी यांच्या कार्यालयात ठेकेदारांनी आपल्या तक्रारी मांडला. यावेळी सर्व ठेकेदार आक्रमक होते.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1640953932187942915?s=20