इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
शिवसेना ठाकरे गटाच्या विरोधानंतर पीव्हीआर सिनेमाने भारत – पाकिस्तानमधील अंतिम सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग करणार नसल्याचे स्पष्ट केले. महाराष्ट्रातील पीव्हीआर सिनेमागृहात हा सामना दाखवण्यात येणार नाही.
शनिवारी एक ट्विट करत पीव्हीआरने देशभरात भारत – पाकिस्तान सामन्यांचे लाईव्ह स्ट्रिमिंग करणार असल्याचे सांगितले होते. त्यासाठी देशभरातील १०० हून अधिक स्क्रिन्सचे नियोजनही केले होते. पण, ठाकरे गटाने विरोध करताच त्यांनी हा निर्णय मागे घेतला.
या निर्णयाअगोदर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटले होते, हा तर नीच पणाचा कळस: PVR मधील” पी “ म्हणजे पाकिस्तान आहे काय? हे पीव्हीआर वाले भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याचे थेट प्रक्षेपण सर्वत्र दाखवणार आहेत. ह्यांच्यात एवढी हिम्मत आणि निर्ल्लजपणा येतो कोठून? सोनम वांगचुक याना पाकिस्तानशी सहानुभूती ठेवल्याच्या आरोपाखाली देशद्रोही ठरवून अटक केली, आता त्याच आरोपाखाली या हरामखोर पीव्हीआर वाल्याना अटक करा, फडणवीस आहे एवढी हिम्मत? भारत पाकिस्तान सामना खेळणे,खेळवणे, दाखवणे,पहाणे, हा पहलगाम मधील सिंदूर उजाडलेल्या महिलांचा अपमान आहे, देश द्रोह आहे! क्रिकेट आणि दहशतवाद एकत्र चालणार नाही! पीव्हीआर तुमच्याकडे हिंदुतवादी जनतेचे लक्ष्य आहे!