नाशिक – येथील भोसला मिलिटरी कॉलेजच्या कॉलेज डेव्हलपमेंट कमिटीचे चेअरमन व प्रसिध्द चार्टर्ड अकौंटंट हेरंब गोविलकर यांच्या मन तरंग… मोक्षाचे या पुस्तकाचे बुधवारी (ता.१४) दुपारी तीनला आभासी(ऑनलाईन) पध्दतीने प्रकाशन होईल.
श्रीरंग नगरमधील नारायण काका ढेकणे महाराज आश्रमात निवडक मान्यवरांच्या उपस्थित हा कार्यक्रम होईल. त्यात प.पू.प्रकाश प्रभुणे महाराज, वेदमूर्ती प. पू.सूर्यकांत राखे गुरुजी व जेष्ठ अर्थतज्ञ डॉ. विनायक गोविलकर हे सोहळ्यास उपस्थित राहतील. यावेळी कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन केले जाईल. मोक्ष अर्थात मुक्ती….हे शब्द आध्यात्मिक माणसाच्या जिव्हाळ्याचे शब्द आहे. आध्यात्माच्या मार्गावर चालणाऱ्या खऱ्या साधकाचे अंतिम ध्येय म्हणजे मुक्तीच असते. एक तर जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती अथवा जिवंतपणी सर्व वासनांपासून, द्वैतापासून मुक्ती असा साधा मोक्षाचा अर्थ घेता येईल. निश्चित ध्येय गाठल्याशिवाय थांबू नका असे कठोपनिषद सांगते. हे ध्येय कोणते? हे ध्येय, ईप्सित मानवजातीसाठी मोक्षच होय.
स्वामी विवेकानंद म्हणतात “मानव हा मुक्तीसाठीच जन्मास येत असतो. ह्या जन्मात नाहीतर पुढच्या जन्मात तो मोक्षासाठी प्रयत्न करत राहतो. त्याला स्वर्गप्राप्ती पेक्षाही मोक्ष हवा असतो.” प्रत्येकाच मोक्ष,मुक्तीबद्दल कुतुहल निर्माण होते, हेच लक्षात घेऊन श्री.गोविलकर यांनी विविध माहिती मिळवत काही स्वतः अनुभव घेत या अनोख्या पुस्तकांचे संकलन केले आहे. त्यांचे बंधु आणि प्रसिध्द अर्धतज्ञ डॉ.विनायक गोविलकर यांची पुस्तकांसाठी प्रस्तावना आहे. या प्रस्तावनेत गोविलकर यांनी मोक्ष आणि त्यांची संकल्पना,मानवाची भावना याबाबींचा सुरेख आढावा घेतला आहे. साधकांनी कार्यक्रमस्थळी गर्दी न करता साधक हा कार्यक्रम u tube वर live पाहू शकता त्यासाठी https://youtube.com/user/SiddhayogaMahayoga ही लिंक आहे. असे आवाहन गोविलकर परिवारातर्फे करण्यात आले आहे.