इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सध्या देशभरात पुष्पा या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. सहाजिकच या चित्रपटांमधील कलाकार नेमके काय करतात. याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले असते. त्यामुळे या चित्रपटातील एका अभिनेत्रीच्या लग्नाची सध्या चर्चा सुरू आहे ‘ पुष्पा’ फेम रश्मिका मंदान्ना प्रत्येकाच्या हृदयाची धडधड बनली आहे. विशेषतः ‘पुष्पा’ नंतर तिची लोकप्रियता आणखी वाढली. अलीकडेच अशी चर्चा होती की, रश्मिका मंदान्ना आणि तेलुगु चित्रपटांचा सुपरस्टार विजय देवरकोंडा रिलेशनशिपमध्ये असून ते लग्न करणार आहेत. दोघेही मुंबईत एकत्र दिसले होते. या वर्षाच्या अखेरीस दोघेही लग्न करणार असल्याची चर्चा होती. आता विजय देवरकोंडा यांनी या संपूर्ण प्रकरणावर मौन तोडले असून ट्विट करून याची सत्यता सांगितली आहे.
विजय म्हणतो की, हा मूर्खपणा आहे कारण हे नेहमीच घडले आहे. याबाबत आता विजयचे ट्विट व्हायरल होत आहे.
रश्मिका आणि विजयच्या अफेअरच्या बातम्या यापूर्वीही येत होत्या. दोघांनी मिळून ‘डियर कॉम्रेड’ आणि ‘गीता गोविंदम’ हे दोन सुपरहिट चित्रपट केले आहेत. पडद्यावरची त्यांची जोडी चाहत्यांना आवडते. एवढेच नाही तर पापाराझींनी त्यांना अनेकवेळा आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. त्याच वेळी जेव्हा ही अफवा उडू लागली तेव्हा विजयने हे ट्विट केले. दरम्यान, विजय देवरकोंडा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तो आता धर्मा प्रॉडक्शनच्या अॅक्शन थ्रिलर लिगरमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अनन्या पांडे आहे. दुसरीकडे रश्मिका मंदान्ना सध्या ‘पुष्पा’च्या यशाचा आनंद घेत आहे. मात्र गेल्या महिन्यात ती करण जोहरसोबत मुंबईत दिसली होती.
https://twitter.com/TheDeverakonda/status/1495774835292897280?s=20&t=Wlsc9IUlC6Ce3586fHFd1A
भारतीय चित्रपट सृष्टीत सिनेमाची परंपरा मोठी आहे. त्यातच हिंदी म्हणजेच बॉलिवूड चित्रपटसृष्टी बरोबरच तमिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड या दाक्षिणात्य चित्रपटांची मोठी चलती असून रसिक मनावर क्रेझ आहे. किंबहुना दाक्षिणात्य चित्रपट प्रचंड प्रमाणावर चालतात. याला कारण म्हणजे तेथील रसिक प्रेक्षक वर्ग होय. त्यामुळेच चित्रपटांमधील सर्व तारकांना प्रेक्षक अक्षरशः डोक्यावर घेऊन नाचतात.