इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – चित्रपट सृष्टीतील सेलिब्रिटींविषयी सर्वसामान्यांमध्ये नेहमीच आकर्षण असते. विशेषतः त्यांची संपत्ती किती आहे याची अनेक जण वेळोवेळी चर्चा करत असतात. विशेषतः दक्षिण भारतातील अनेक सेलेब्रिटी तथा सिने कलाकार प्रचंड श्रीमंत असून त्यांच्याकडे हा अमाप संपत्ती आहे. याला कारण म्हणजे दक्षिण भारतातील नागरिकांना चित्रपटांचे प्रचंड वेड असून चित्रपट पाहणे हा त्यांचा छंद आहे. त्यामुळेच अनेक कलाकारांना प्रचंड पैसा मिळतो, तेथे वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट अनेक महिने चांगला पैसा कमावतात. दक्षिण भारतीय सुपरस्टार अल्लू अर्जुनचा नवीन चित्रपट पुष्पा सध्या चर्चेत आहे. अल्लू अर्जुनने पुन्हा एकदा आपल्या दमदार अभिनयाने आणि धमाकेदार अॅक्शनने चाहत्यांना प्रभावित केले. कारण अल्लूचा अभिनय उत्कृष्ट आहे पण त्याची शैलीही अप्रतिम आहे.
2016 मध्ये अल्लू अर्जुनला गुगलवर सर्वाधिक सर्च केले गेले. हा विक्रम करणारा तो दक्षिण सिनेमातील एकमेव अभिनेता आहे. अभिनेता चिरंजीवीचा तो पुतण्या असून रामचरण तेजाचा चुलत भाऊ आहे. अल्लू अर्जुन त्याच्या चित्रपटातून करोडोंची कमाई करतो. तो दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. अल्लूची जीवनशैलीही कोणा राजा महाराजांपेक्षा कमी नाही. त्याचे आलिशान घर आणि करोडोच्या गाड्या अल्लू अर्जुनच्या लक्झरी लाइफचे प्रदर्शन करतात. दक्षिण भारतीय अभिनेता अल्लू अर्जुनची नेट वर्थ, कमाई, कार कलेक्शन प्रचंड आहे.
एका रिपोर्ट्सनुसार, अभिनेता अल्लू अर्जुनची एकूण संपत्ती 350 कोटी रुपये आहे. अल्लू अर्जुनची वार्षिक कमाई 32 कोटींहून अधिक आहे. अल्लू अर्जुनचे हैदराबादमध्ये आलिशान घर आहे. याशिवाय 800 जुबिली नावाचे कार्यालय आणि नाईट क्लब देखील आहे. अल्लू अर्जुन एका चित्रपटासाठी 15 कोटी रुपये घेत असला तरी त्याच्या मागील ‘अला वैकुंठपुरमलो’ या चित्रपटासाठी अल्लू अर्जुनने 25 कोटी रुपये घेतले होते. त्याचबरोबर पुष्पा या चित्रपटासाठीही त्याने तेवढीच रक्कम घेतली आहे. चित्रपट आणि नाइटक्लब व्यतिरिक्त अल्लू अर्जुन ब्रँड एंडोर्समेंटमधून भरपूर कमाई करतो. तसेच एका ब्रँडची जाहिरात करण्यासाठी तो सुमारे 3 कोटी रुपये घेतो.
विशेष म्हणजेच अलीकडे अल्लू अर्जुनचे घर चर्चेत होते. अल्लू अर्जुनचा हैदराबादमधील पॉश भाग असलेल्या जुबली हिल्समध्ये एक आलिशान बंगला आहे. या बंगल्याची किंमत 100 कोटी रुपये आहे. लोकप्रिय इंटिरियर डिझायनर अमीर आणि हमीदा यांनी बंगल्याची सजावट केली. येथे तो आपल्या दोन मुलांसह पत्नीसह राहतो. अल्लू अर्जुनचा आलिशान बंगला लक्झरी वाहनांच्या कलेक्शनने सजलेला आहे. त्याच्याकडे रेंज रोव्हर कार आहे, ज्याची किंमत सुमारे 2.50 कोटी रुपये आहे. त्याचबरोबर त्यांच्याकडे स्वतःची 7 कोटींची व्हॅनिटी व्हॅन आहे. याशिवाय 80 लाखांची BMW X5, Jaguar XJ L, Audi A7 आहे. त्याची सर्व संपत्ती सर्वसामान्यांचे डोळे दिपवणारी आहे एवढे मात्र नक्कीच म्हणता येईल.