सिध्दी दाभाडे
मुंबई – कोरोना प्रादुर्भावानंतर सिनेमागृहात धुमाकुळ घातलेल्या ‘पुष्पा’ मुव्ही फेम अल्लू अर्जुनचा त्याच्या पत्नीसोबतचा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे. या व्हिडिओला अर्जूनच्या चाहत्यांनी पसंती दिली आहे. या व्हिडीओमध्ये अल्लू अर्जुनने काळ्या रंगाचा सूट ए स्नेहाने लखलखता मिरर वर्क असलेल्या लेहेंगाचा पेहराव केला आहे. या स्टाईलने अनेक तरुण-तरुणींचे स्टाईल अपडेशन केले आहे. अल्लू अर्जून साऊथमध्ये प्रसिध्द आहेच. पण, टीव्हीवर येणा-या त्याच्या हिंदी रिमेकमुळे तो इतर राज्यातही अनेकांचा चाहता आहे. पण, पुष्पानंतर त्याच्या चाहत्यांमध्ये आता वाढ झाली आहे. त्यामुळे त्याचा अगोदर अपलोड झालेला हा व्हिडिओ आता इतर राज्यातील प्रक्षेकही आवडीने बघत आहे.
अल्लू अर्जूनचा नुकताच आलेला सिनेमा ‘पुष्पा’ ने ३०० कोटींचा गल्ला जमवत प्रेक्षकांची मने जिंकली आहे. स्टाईल आणि लुकसाठी फेमस असलेल्या अर्जुनने ‘दिवाळी पार्टी अॅट टूगेदररनेस फार्म हाउस’ असा सह पत्नीसोबतचा व्हिडिओ ७ नोव्हेंबर २०२१ रोजी इंस्टाग्राम या सोशल मीडियावर अपलोड केला होता. आणि बघता बघता त्याला ५२ लाखांपेक्षा जास्त प्रेक्षकांनी पसंती दिली आहे. या व्हिडिओ मध्ये असलेल्या झगमगत्या दिव्यांच्या रोषणाईची सजावट असून हे कपल दिव्यांच्या रोष्णाईत एन्ट्री करतांना दिसत आहे. हा व्हिडिओ तुम्हाला इंन्स्टाग्रामवर बघता येईल….