इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कोरोनाचे आफ्टरशॉक्स आणि चित्रपट निर्मितीचा वाढता खर्च यासारख्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी तेलगू फिल्म प्रोड्यूसर गिल्ड (ATFPG) च्या सदस्यांनी ऑगस्टपासून राज्यभरात अनेक तेलुगू चित्रपटांचे चित्रीकरण थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रख्यात चित्रपट निर्माते दिल राजू यांनी ATFPG च्या शूटिंग थांबवण्याच्या आवाहनामुळे अनेक चित्रपटांचे शूटिंग रद्द केल्याचे सांगितले.
दरम्यान, अभिनेता विजय अभिनीत त्याच्या आगामी तामिळ चित्रपटाचे शूटिंग मात्र सुरू आहे. राज्यात काही तमिळ आणि इतर बिगर तेलुगू चित्रपटांचे शूटिंग कोणत्याही व्यत्ययाशिवाय सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2’सह अनेक चित्रपटांचं शूटिंग रखडलं आहे. वास्तविक, चित्रपट निर्मात्यांनी ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात चित्रपटाच्या निर्मितीचं नियोजन केलं होतं. मात्र निर्मात्यांनी संपाला पाठिंबा देत प्रकरण निकाली निघेपर्यंत स्थगिती दिली आहे.
तेलुगू निर्मात्यांच्या या संपामुळे अनेक तेलुगू चित्रपटांची निर्मिती रखडली आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा 2’ देखील रखडला आहे. ‘पुष्पा: द राइज’ या सुपरहिट चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. चित्रपट निर्मात्यांनी ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात या चित्रपटाच्या निर्मितीचं नियोजन केलं होतं. मात्र निर्मात्यांनी आता संपाला पाठिंबा देत प्रकरण तोडगा निघेपर्यंत स्थगिती दिली आहे.
चित्रीकरण पुन्हा कधी सुरू होईल, या प्रश्नावर ‘पुष्पा’चे निर्माते वाय रविशंकर म्हणाले की, ते संप संपण्याची वाट पाहतील. “तेलुगू इंडस्ट्रीत संप सुरू आहे. संप संपल्यानंतर आम्ही ऑगस्टच्या अखेरीस चित्रीकरणाला सुरुवात करू किंवा जेव्हा संप संपेल तेव्हा या चित्रीकरणाला सुरुवात होईल. निर्मात्यांच्या मुद्द्यावर चेंबरने संप पुकारला आहे. आम्ही शूट करू शकत नाही,” असं त्यांनी स्पष्ट केलं. पुष्पाच्या सीक्वेलसोबत इतरही दाक्षिणात्य चित्रपटांचं शूटिंग रखडलं आहे.
दिग्दर्शक सुकुमार यांच्या जवळच्या एका सूत्राने सांगितलं की, चित्रपट निर्मात्यांना विश्वास आहे की हे प्रकरण लवकरच सोडवलं जाईल आणि चित्रपटाचं शूटिंग सप्टेंबरच्या सुरुवातीला सुरू होईल. निर्माते शूटिंग सुरू करण्यासाठी सज्ज होते, मात्र आता ते संप मिटण्याची वाट पाहत आहेत. तेलुगू चित्रपट उद्योगातील निर्मात्यांनी त्यांच्या समस्यांचं निराकरण होईपर्यंत सर्व चित्रपटांचं शूटिंग थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.
उत्पादन खर्च वाढला आहे, प्रेक्षक चित्रपटगृहात येत नाहीत, तिकिटांच्या किमतींबाबतचे नियम आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवरील वाढती आव्हाने, या सगळ्या समस्यांचा सामना करावा लागत असल्याने निर्मात्यांनी हा संप पुकारला आहे. ‘पुष्पा: द राइज’ या चित्रपटाचा सिक्वेल २०२३ मध्ये चित्रपटगृहात येण्याची शक्यता आहे. अलीकडेच अल्लू अर्जुनने इन्स्टाग्रामवर त्याचा नवीन लूक शेअर केला. ‘पुष्पा २’ मधील हा हा त्याचा लूक असू शकतो, असा नेटकऱ्यांचा अंदाज आहे.
Pusha 2 Telugu Movie Shooting Stop
Tollywood Entertainment