इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर भगवंत मान हे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यामुळेच त्यांनी आज एक मोठी घोषणा केली आहे. पंजाबमधून भ्रष्टाचार हद्दपार करण्यासठी त्यांनी आज एक व्हिडिओ सर्वांसाठी शेअर केला आहे. सरकारी बाबूंच्या खाबूगिरीला आळा घालण्यासाठी आप सरकार येत्या २३ मार्च रोजी एक हेल्पलाईन जाहिर करणार आहे. अँटी करप्शनसाठीचा हा हेल्पलाईन नंबर शहिद दिनाच्या दिवशी जनतेला उपलब्ध होईल. सर्व सामान्य जनतेला एकप्रकारे मोठे शस्त्र याद्वारे मिळणार आहे. मुख्यमंत्री मान यांनी त्यांचा व्हॉटसअॅप क्रमांक दिला असून ज्यांना तक्रार करायची आहे त्यांनी व्हिडिओ किंवा ऑडिओ या क्रमांकावर पाठवायचा आहे. संबंधितांवर कठोर कारवाईचे आश्वासन मान यांनी दिले आहे.
बघा मुख्यमंत्री भगवंत मान यांचा हा व्हिडिओ
https://twitter.com/AamAadmiParty/status/1504404254609444876?s=20&t=DMz90moYYVvmnIWqj6Q69w