इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारतीय राज्यघटनेने स्त्री पुरुषांना समानतेचा अधिकार दिला आहे. तसेच आजच्या आधुनिक काळात स्त्री आणि पुरुष दोघी अनेक क्षेत्रात एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात. राजकारणात देखील अनेक स्त्रिया पुढे आलेल्या दिसतात. परंतु अद्यापही स्त्रियांना पाहिजे, तितके स्थान राजकारणात मिळालेली दिसून येत नाही. ज्या महिलांना राजकारणात स्थान मिळालेले आहे. त्यांच्यावर देखील त्यांच्या पतीचाच रिमोट कंट्रोल असतो, असे दिसून येते. पंजाबमध्ये एक संतापजनक घटना घडली आहे. आमदार महिलेला तिच्या पतीने सर्वांसमोर कानशिलात लगावली. आणि या घटनेचा व्हिडिओ आता शोशल मिडियात व्हायरल झाला आहे.
आम आदमी पक्षाच्या (आप) आमदार बलजिंदर कौर यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. बलजिंदर कौर यांना त्यांच्या पतीने सर्वांसमोर कानशिलात मारली आहे. सीसीटीव्हीमध्ये ही घटना शुट झाली आहे. व्हिडिओमध्ये आप आमदार बलजिंदर कौर आणि त्यांचे पती यांच्याशिवाय इतर काही जण उभे आहेत, जे मध्यस्थी करताना दिसत आहेत. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत असून या व्हिडीओची तुफान चर्चा झाली आहे.
आप आमदार बलजिंदर कौर यांच्यासोबत झालेल्या घटनेचा व्हिडीओ पंजाब युवक काँग्रेसचे अध्यक्ष बरिंदर यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ट्विट करताना बरिंदर यांनी व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, आमदार बलजिंदर कौर यांना दिवसाढवळ्या कानशिलात मारण्यात आली हे आश्चर्यचकित करणारे आहे. पुरुषांची मानसिकता बदलावी लागेल. इतर काहीही बदलण्याआधी ही पुरुषप्रधान वृत्ती बदलली पाहिजे.
तसेच पंजाब महिला आयोगाच्या अध्यक्षा मनीषा गुलाटी यांनी स्वत: या प्रकरणाची दखल घेण्याचे सांगितले आहे. मी सोशल मीडियावर बलजिंदर कौरचा व्हिडीओ पाहिला आहे. समाजाचे प्रश्न मांडणाऱ्या महिलेला तिच्याच घरात हिंसाचार सहन करावा लागत आहे, हे धक्कादायक आहे असं म्हटलं आहे. खरे तर बलजिंदर कौर पंजाबच्या तलवंडी साबोच्या आमदार आहेत. पंजाब विधानसभा निवडणुकीत ते पुन्हा याच जागेवरून विजयी झाल्या. निवडणुकीत बलजिंदर कौर यांनी काँग्रेस उमेदवाराचा मोठ्या फरकाने पराभव केला होता. ‘देशात महिलांविरुद्ध अत्याचाऱ्यांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. पुरूषांची मानसिकता बदलावी लागेल. अन्य काही बदलण्यापूर्वी ही पुरूषप्रधान वृत्ती बदलली पाहिजे,” असे बरिंदर यांनी म्हटले आहे.
https://twitter.com/brinderdhillon/status/1565382997523963904?s=20&t=IAAie85WElFCxmzkbY8GWQ
Punjab Women MLA Slapped by Husband Video Viral
AAP MLA Baljinder Kaur Politics