अमृतसर (पंजाब) – भारताने अनेक वेळा चांगलीच खोड मोडूनही पाकिस्तानची मस्ती अद्यापही जिरलेली दिसत नाही, त्यामुळेच कोणत्याही प्रकारे भारतात शस्त्रास्त्रांचा अवैध मार्गाने शिरकाव करून दहशतवाद पसरविण्याचे पाकीस्तानचे कारस्थान असते. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या कटकारस्थानाला भारतातील काही विघातक शक्ती साथ देतात. परंतु अनेक वेळा भारतीय सैन्य दल आणि पोलीस मात्र मोठ्या धैयाने पाकिस्तानचा आणि दहशतवाद्यांचा हा कट उघडकीस आणून हाणून पाडतात.
पंजाब पोलिसांनी दहशतवादी कारवायांचा पर्दाफाश करत दोन जणांना अटक केली. त्यापैकी एक म्हणजे अकाल तख्तचे माजी जथेदार जसबीर सिंह रोडे यांचा मुलगा गुरूमुख सिंग त्याला जालंधरच्या हर्डीलालमधील घरातून अटक करण्यात आली आहे. कपूरथलाचे पोलीस निरीक्षक हरकमलप्रीत सिंह खाक म्हणाले की, प्राथमिक तपासात ही शस्त्रे पाकिस्तानातून आल्याचे समोर आले आहे. तरूणांच्या माध्यमातून पंजाबमध्ये दहशत पसरवण्याचा पाकचा हेतू होता. गुरमुख सिंग आणि त्याचा साथीदार गगनदीप यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जसबीरसिंह रोडे यांनी सांगितले की, पोलिसांनी आपल्या मुलाच्या अटकेनंतर त्याच्या घराची झडती घेतली होती, पण तेथून त्यांना काहीही सापडले नाही. परंतु पंजाब मधील कपूरथला पोलिसांनी दोन हँड ग्रेनेड, डेटोनेटरचा बॉक्स, आरडीएक्सने भरलेल्या दोन नळ्या, स्फोटकांमध्ये वापरलेली वायर, 3.75 लाख रुपये किमतीचे भारतीय चलन, एक पिस्तूल, 14 भारतीय पासपोर्ट , 30 कॅलिबर पिस्तूल आणि दोन मासिके, एक टिफिन बॉम्ब, तीन हँड ग्रेनेड, चार ग्लॉक पिस्तूल मॅगझिन आणि पॅकेजिंग साहित्य गुरमुख यांच्या कार्यालयातून जप्त करण्यात आली आहेत. याशिवाय पोलिसांनी त्याचे कार्यालय जालंधर बस स्टँड जवळ आहे.
या ऑपरेशनचे नेतृत्व करणाऱ्या पंजाबच्या एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, गुरुमुख यांच्या घरी सापडलेला टिफिन बॉम्ब अमृतसरमध्ये अलीकडे सापडलेल्या बॉम्बसारखाच आहे. तसेच एनआयए आता या प्रकरणाचा तपास करत आहे. गुरमुख सिंग हा इंटरनॅशनल यूथ शीख फेडरेशनशी संबंधित असल्याचे सांगितले जाते. त्याचे वडील जसबीरसिंह रोडे हे जरनैल सिंह भिंद्रनवाले यांचे पुतणे आहेत. तर दुसरीकडे त्याचा भाऊ लखबीर सिंह रोडे हा भारतातील मोस्ट वॉन्टेड खलिस्तानी दहशतवाद्यांपैकी एक आहे.
सध्या तो पाकिस्तानात असल्याचा संशय आहे. फगवाडा येथून अलीकडेच अटक करण्यात आलेल्या गगनदीप सिंगकडून कपूरथला पोलिसांना गुरूमुख सिंगचा सुगावा मिळाला होता. तसेच गगनदीपकडून बेकायदेशीर पिस्तूल जप्त करण्यात आले. चौकशीदरम्यान गगनदीपने सांगितले की, हे पिस्तूल गेल्या काही दिवसांपासून सीमेपलीकडून ड्रोनद्वारे आलेल्या शस्त्रात्रांचा तो एक भाग होता. यातील खूप मोठा हिस्सा त्याचा मित्र गुरमुखकडे आहे.