चंदीगड – पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी अखेर काँग्रेस पक्षाला रामराम केला आहे. आपल्या पक्ष सदस्यत्वाच्या राजीनाम्याचे पत्र त्यांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना पाठविले आहे. सिंग यांना मुख्यमंत्री पदावरुन हटवत काँग्रेसने चेन्नी यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ टाकली आहे. ही बाब सिंग यांच्या अतिश जिव्हारी लागली. ते काँग्रेस पक्षावर अतिशय नाराज होते. गेल्या काही दिवसात त्यांच्या भाजपसह विविध नेत्यांशी गाठीभेटी सुरु होत्या. अखेर त्यांनी नव्या पक्षाची घोषणा केली आहे. पंजाब लोक काँग्रेस असे त्यांच्या नव्या पक्षाचे नाव आहे. निवडणूक आयोगाने त्यास मान्यता दिली आहे. पक्षाचे चिन्ह नंतर निश्चित केले जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
https://twitter.com/capt_amarinder/status/1455501437752856578