इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पंजाबच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी आज सकाळी झाल्यानंतर तातडीने मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली. १० कॅबिनेटमंत्र्यांसह मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत विविध विषयांवर चर्चा केली. तसेच, राज्यात तातडीने २५ हजार पदे भरण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आला. येत्या महिन्याभरात ही पदे भरली जाणार आहेत. त्यासंदर्भात आवश्यक ती सर्व कार्यवाही जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश मान यांनी प्रशासनाला दिले आहेत. पंजाबच्या विविध सरकारी विभागांमध्ये पदे रिक्त आहेत. त्यात एकूण २५ हजार पदे सर्वप्रथम भरली जाणार आहेत. या भरतीमध्ये पंजाबमधील युवकांना संधी मिळणार आहे. पोलिस दलात १० हजार आणि अन्य सरकारी विभागात १५ हजार अशी एकूण २५ हजार पदे भरली जाणार असल्याच्या घोषणेने पंजाबमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
https://twitter.com/BhagwantMann/status/1505135796038238208?s=20&t=4jvaisHCyKYrz03kp_3gRQ