इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पंजाबमधील लुधियाना येथे मागील आठवड्यात एका कॅश घेऊन जाणाऱ्या दरोडा पडला होता. यात कोट्यावधीची रोकड लंपास झाल्याने राज्यभरात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत पंजाब पोलिसांनी तात्काळ सूत्र हालवत राज्यभरात असून चौकशी करीत तपास यंत्रणा कामाला लावली, अखेर या प्रकरणात अट्टल गुन्हेगार असलेली दरोडेखोर महिला व तिच्या ९ साथीदारांना अटक करण्यात आली आहे. मात्र यासाठी पोलिसांनी अनोखी युक्ती वापरली.
नेपाळ जाण्याच्या तयारीत
लुधियाना येथील न्यू राजगुरूनगर परिसरामध्ये दि.१० जून रोजी मध्यरात्री काही हत्यारबंद दरोडेखोरांनी एका कॅश व्हॅनवर दरोडा घातला होता. त्या दरोड्यातून सुमारे ८ कोटी ४९ लाख रुपये लुटण्यात आले होते. ही कॅश व्हॅन घटनास्थळापासून सुमारे २० किमी अंतरावर सापडली होती, मात्र या दरोड्यातील मास्टरमाईंड असलेली सराईत महिला दरोडेखोर मनदीप कौर मोना आणि तिचा पती, तसेच ९ साथीदार फरार झाले होते, मोना आणि तिचा पती नेपाळमार्गे परदेशात पळण्याच्या तयारीत होते. मात्र सीमा सुरक्षा दल आणि नेपाळ सरकारला या संदर्भात खबर देऊन कोणालाही सीमा भागात येण्या जाण्यासाठी प्रवेश देऊ नये, यासाठी कडक चौकशी करण्याचे पंजाब पोलिसांनी सूचीत केले होते. पोलीस पथकाने अखेर मोना तिचा सहकारी गौरव उर्फ गुलशन यालाही बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या प्रकरणी आतापर्यंत ९ जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच
त्यांच्याकडून सुमारे २१ लाख रुपये जप्त केले आहेत.
मोफत फ्रुटी पिण्याच्या मोह
कॅश व्हॅनवरील दरोड्याच्या प्रकरणात मोना ही साथीदारांसह फरार होऊन हेमकुंड साहिब येथे गेली होती. त्यानंतर केदारनाथ आणि हरिद्वार येथेही जाण्याचा तिचा प्लॅन होता. मोना ही उत्तराखंडमधील चमोलीत
हेमकुंड साहिब येथे दर्शनासाठी आली होती, याची पोलिसांना खबर मिळताच त्यांनी तेथे मोफत फ्रुटी वाटपाची योजना आखली. मोना तिथे फ्रुटी घेण्यासाठी थांबली. तिथेच तिला पंजाब पोलिसांनी अटक केली आहे. तसेच तिच्या पतीसह एकूण नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. या आरोपींकडून ५ कोटी ९६ लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. दरोड्यातील मास्टरमाईंड असलेली ही लेडी दरोडेखोर केवळ १० रुपयांच्या फुकटातील फ्रुटीच्या मोहापायी पोलिसांच्या तावडीत सापडली, याची सर्वत्र चर्चा होत आहे.