इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – नट-नट्यांसारखं राहण्याचं आकर्षण फार विचित्र आहे. एकदा का त्याची सवय लागली की, त्यातून सावरणं फार अवघड होतं. विशेषतः तरुणींना नट्यांसारखं लाईफ-स्टाईल, त्यांच्यासारखे कपडे घालण्याची विशेष आवड असते. मात्र गुरुग्राममधील एका विवाहित महिलेची ही आवड तिला घटस्फोटाच्या दारात घेऊन गेली. केवळ तिच्या जिद्दीमुळे संसाराचा सत्यानाश झाला.
पंजाब कोर्टाने या घटस्फोटावर अलीकडेच शिक्कामोर्तब केले आहे. कौटुंबिक न्यायालयाने दिलेल्या निकालाला महिलेने आव्हान दिले होते. पत्नी रात्री उशिरापर्यंत टीव्ही बघते. नट्यांसारखे कपडे घालण्यासाठी हट्ट करते. त्यासाठी दबाव आणते. २००८ मध्ये विवाह झाल्यापासून तिचा स्वभाव तापटच आहे. छोट्या छोट्या गोष्टींवरून पतीशी ती भांडते. घरातील कोणतेच काम करत नाही. घरी पाहुणे आले तर चहासुद्धा करत नसल्याचे पतीचे म्हणणे होते.
सुंदर दिसण्यासाठी जवळपास साऱ्याच युवतींचा आटापिटा असतो. त्यासाठीचे सारे प्रयत्नही महिला करून बघत असतात. पण, अभिनेत्रींसारखेच दिसायचे. त्यांच्या प्रमाणेच ड्रेस घालण्याचा आग्रह, मुलांकडे दुर्लक्ष, पतीच्या अपेक्षांकडे दुर्लक्ष हा प्रकार सहसा दिसत नाही. पण, चंडीगड मधील प्रकरणात महिलेचा पराकेटीचा अट्टाहास घटस्पोठाचा आधार ठरले. सतत दबाव टाकणारी पत्नी विभक्त झाल्याचे समाधान पतीकडून व्यक्त करण्यात आले.
न्यायालयही म्हणाले, पत्नी क्रूर
न्यायालयात पतीने सांगितले की, पत्नीने अनेकदा आपल्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दिलेली आहे. तपासात तिची तक्रार खोटी असल्याचे सिद्ध झालेले आहे. त्यामुळे कौटुंबिक न्यायालयाने पत्नीला क्रूर ठरवत घटस्फोटाचे आदेश दिले होते. या आदेशाविरुद्ध पत्नीने हायकोर्टात याचिका दाखल केली होती. पत्नीचे जबाब वारंवार बदलत असल्याचे न्यायालयाच्या लक्षात आले. पत्नीने २०१४ मध्ये घर सोडले होते. त्यानंतर तिने मुलांनाही भेटण्याचा प्रयत्न केला नाही.
Punjab Family Court Divorce Husband Wife Dispute