इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पंजाबचे शिक्षण मंत्री हरजोत बैंस यांनी आयपीएस अधिकारी ज्योती यादव यांच्याशी लग्नगाठ बांधली आहे. कारज नांगल येथील ऐतिहासिक गुरुद्वारा विभोर साहिब येथे हा विवाह सोहळा संपन्न झाला. पंजाब विधानसभेचे अध्यक्ष कुलतार सिंग संधवा यांच्याशिवाय केवळ कुटुंबीयच यावेळी उपस्थित होते.
पंजाबचे शिक्षणमंत्री हरजोत सिंग बैंस हे लग्नबंधनात अडकले आहेत. श्री आनंदपूर साहिबमध्ये आयपीएस अधिकारी आणि सध्याचे मानसाच्या पोलिस अधिक्षक ज्योती यादव यांच्याशी त्यांचा विवाह झाला आहे. दोन्ही कुटुंबांनी लग्नाची जोरदार तयारी केली होती. ज्योती यादव 2019 बॅचच्या IPS अधिकारी आहेत आणि त्यांचे कुटुंब गुरुग्राममध्ये राहते.
Punjab Education Minister Harjot Bains tied a knot with IPS officer Jyoti Yadav pic.twitter.com/mhPnfNAtDd
— Harpreet Singh Bajwa (@Harpreet_TNIE) March 25, 2023
मुख्यमंत्र्यांसह आपच्या तीन आमदारांचा विवाह संपन्न
पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे (आप) सरकार स्थापन झाल्यानंतर पक्षाच्या अविवाहित मंत्री आणि आमदारांनी आपल्या आयुष्यातील नव्या पर्वालाही सुरुवात केली आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री भगवंत मान यांनी गेल्या वर्षी जुलैमध्ये डॉ. गुरप्रीत कौर यांच्याशी लग्न केले. पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर भगवंत मान यांचे हे दुसरे लग्न होते. यानंतर, 7 ऑक्टोबर 2022 रोजी, संगरूरमधील 27 वर्षीय आप आमदार नरेंद्र कौर भाराज यांनी देखील पक्ष कार्यकर्ता मनदीप सिंह लाखेवाल यांच्याशी लग्न केले.
यावर्षी २६ जानेवारीला फाजिल्का येथील आपचे आमदार नरिंदर पाल सिंग सावना (वय ३१) यांनी खुशबू सावनसुखशी लग्न केले. ३० जानेवारीला फिरोजपूरचे आमदार ६२ वर्षीय रणवीर सिंग भुल्लर यांनी अमनदीप कौर गोन्सल यांच्याशी लग्न केले. रणवीर भुल्लरचे हे दुसरे लग्न आहे. त्यांच्या पहिल्या पत्नीचे निधन झाले आहे. याशिवाय बाघा पुराणाचे आमदार अमृतपाल सिंग सुखानंद, राज्याचे क्रीडा मंत्री गुरमीत सिंग मीत हेअर आणि आपचे खासदार राघव चढ्ढा हे अद्याप अविवाहित आहेत. लवकरच त्यांच्या घरातही सनई चौघडे वाजणार आहेत.
Punjab Education Minister Tie Knot With IPS Jyoti Yadav