इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सत्ता स्थापनेनंतर विविध निर्णयांचा धडाका कायम ठेवला आहे. आजही त्यांनी शालेय शिक्षणाशी संदर्भातील काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. मुख्यमंत्री मान म्हणाले की, पंजाबमध्ये शिक्षण एवढे महाग झाले आहे की, सर्वसामान्यांपासून ते दूर होत आहे. त्यामुळेच यावर्षी खासगी शाळांची कुठलीही फी वाढ होणार नाही, असा निर्णय आम्ही घेतला आहे. तसेच, विशिष्ट दुकानातूनच शालेय साहित्य खरेदी करण्याची सक्ती करता येणार नाही, विद्यादानाच्या या क्षेत्राला आम्ही व्यापार बनू देणार नाही, असे मान यांनी म्हटले आहे. पंजाब सरकार यासंदर्भात लवकरच सर्वंकष असे धोरण जाहीर करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
https://twitter.com/BhagwantMann/status/1509129992651030528?s=20&t=AYtWj3doI6gXPbDOHtBqRA