इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर भगवंत मान यांनी निर्णयांचा धडाका लावला आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची तब्बल २५ हजार पदे भरण्याचा निर्णय त्यांनी पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत घेतला. त्यामुळे पंजाबच्या तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यातच आता त्यांनी निवडणुकीत दिलेले एक आश्वासन पूर्ण करण्याबाबत मोठी घोषणा केली. पंजाब सरकारमध्ये विविध विभागात कार्यरत असलेल्या तब्बल ३५ हजार कंत्राटी कामगारांना कायम करण्याचे त्यांनी जाहिर केले आहे. यांसदर्भातील योग्य ती कार्यवाही सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे. आम्ही केवळ बोलत नाही तर निर्णय घेतो, असे सांगत आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. या निर्णयामुळे सध्याचे ३५ हजार कंत्राटी कामगार आणि नव्याने नियुक्त होणारे २५ हजार कामगार असे एकूण ६० हजार कायमस्वरुपी मनुष्यबळ पंजाब सरकारला उपलब्ध होणार आहे. त्यामुळे प्रशासकीय कामकाजासह राज्याच्या विकासात मोलाची भर पडेल, असा विश्वास आपने व्यक्त केला आहे.
https://twitter.com/BhagwantMann/status/1506206306331656196?s=20&t=y2DmnwK5sWj3wNgxIu7lWQ