मोहाली – पंजाबच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्विकारुन काही दिवस उलटत नाही तोच चरणजित चेन्नी यांच्या घरी लक्ष्मी आली आहे. आज त्यांचे पुत्र नवजित सिंग यांचा शुभविवाह सोहळा संपन्न झाला. या समारंभासाठी मुख्यमंत्री चेन्नी हे आपल्या मुलाला घेऊन स्वतः कार चालवत विवाहस्थळी दाखल झाले. येथील गुरुद्वारा सच धन साहिबमध्ये झालेल्या या सोहळ्याला बहुविध मान्यवर उपस्थित होते. नेहमीप्रमाणे त्यांनी विवाहानंतर लंगरचेच भोजन केले. त्यासाठी मुख्यमंत्री सर्वसामान्यांबरोबरच जेवणासाठी मांडी घालूनच पंक्तीत बसले होते. कुठलाही लवाजमा किंवा दिखावा न करता अत्यंत साध्या पद्धतीने सोहळा संपन्न झाला. चेन्नी यांची स्नुषा आणि नववधू सिमरणधीर कौर असे आहे. ती देराबस्सी जवळील अमलाला गावाची ती रहिवासी आहे. ती इंजिनिअरींग पदवीधर आहे. तसेच, ती सध्या एमबीएचे शिक्षण सध्या घेत आहे. आजच्या विवाह सोहळ्याला गुरुद्वाराचे प्रमुख आणि अन्य महत्त्वाचे धर्मगुरू उपस्थित होते. सोमवारी एका हॉटेलमध्ये स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला आहे. बघा या विवाह सोहळ्याचे फोटो