इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना पोटदुखीच्या तक्रारीनंतर दिल्लीच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, त्यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ते प्रदूषित पाणी पिताना दिसत आहे. अशा स्थितीत हे पाणी प्यायल्याने त्यांच्या पोटात दुखू लागले की काय, अशीही चर्चा सुरू झाली आहे.
आम आदमी पार्टीच्या पंजाब युनिटने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये भगवंत मान एका ग्लासमध्ये नदीचे पाणी पिताना दिसत आहेत. पंजाब युनिटने शेअर केलेल्या व्हिडिओचे कॅप्शन पंजाबीमध्ये लिहिले आहे, ‘मुख्यमंत्री सुलतानपूर लोधी येथे पवित्र पाणी पिताना गुरु नानक साहिब यांच्या भूमीला नतमस्तक झाले. भगवंत मान आणि राज्यसभा सदस्य संत सिचेवाल जी यांनी पवित्र स्थानाच्या स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला आहे.
हा व्हिडिओ १७ जुलै रोजी ट्विट करण्यात आला होता. कालीबेन नदीच्या स्वच्छता मोहिमेसाठी पर्यावरणवादी आणि राज्यसभा खासदार बलबीर सिंग सीचेवाल यांनी मुख्यमंत्र्यांना फोन केला होता. यावेळी भगवंत मान यांनी एक ग्लास पाणी प्यायले. आजूबाजूची शहरे आणि गावांचे सांडपाणीही या पाण्यात मिसळत आहे. भगवंत मान यांनी न डगमगता ते प्याले. काही दिवसांनी त्यांना दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल करावे लागले. मात्र, याबाबत आम आदमी पार्टी किंवा पंजाब सीएमओकडून कोणतेही वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही.
https://twitter.com/AAPPunjab/status/1548586677416841217?s=20&t=F6RjlwYgo1dXqBOJa6mD8Q
सुरुवातीला भगवंत मान यांना रुटीन चेकअपसाठी दाखल करण्यात आल्याची बातमी आली होती. मात्र, ओटीपोटात दुखत असल्याच्या तक्रारींमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचेही काही मीडिया रिपोर्ट्समधून समोर आले आहे. संत बलबीर सिंह सीचेवाल नद्या, तलावांसह जलस्रोतांचे प्रदूषण दूर करण्यासाठी मोहीम राबवत आहेत. पंजाबमध्ये वाहणाऱ्या काली बेन नदीच्या स्वच्छतेसाठीही त्यांनी मोहीम राबवली आहे. या अनुषंगाने आयोजित एका कार्यक्रमात त्यांना मुख्यमंत्री भगवंत मान यांना बोलावण्यात आले आणि तेथील पाणी पिल्याने ते आजारी असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Punjab Chief Minister Bhagwant Man admitted in Delhi Apollo Hospital