चंदीगड – कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाबचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर काही काळ मौन पाळले होते. परंतु अखेर त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली असून काँग्रेसमधील पक्ष नेतृत्वावर टीका केली आहे. तसेच त्यांनी नवज्योत सिंग सिद्धू यांच्यासह गांधी कुटुंबालाही लक्ष्य केले.
कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले की, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा यांना अनुभव नसल्याने सल्लागार चुकीचा सल्ला देऊन त्यांची दिशाभूल करत आहेत. तसेच सिंग हे राजीनाम्याबाबत खुलासा करताना म्हणाले की, तीन आठवड्यांपूर्वी सानिया गांधीं यांनी राजीनामा मला देण्याची आज्ञा दिली होती, परंतु नवजत सिंह सिद्धूला पंजाबचे मुख्यमंत्री बनण्यापासून रोखण्याचे सांगितले होते, कारण त्यांचे मुख्यमंत्री होणे पंजाबसाठी धोकादायक ठरेल. असे अनेकांचे मत होते. त्यांनी काँग्रेस नेते के.सी. वेणुगोपाल, अजय माकन आणि रणदीप सुरजेवाला यांच्यावरही टीका केली.
कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या जागी चरणजीत सिंह चन्नी मुख्यमंत्री झाल्यानंतरही पंजाब काँग्रेसमधील वाद थांबलेला दिसत नाही. या उलट कॅप्टन अमरिंदर सिंग आक्रमक पद्धतीने बोलत आहेत. त्यांनी पुन्हा एकदा पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवजात सिंह सिद्धू यांना लक्ष्य करताना म्हटले की, त्यांना कोणत्याही परिस्थितीत पंजाबचे मुख्यमंत्री बनू दिले जाऊ नये. कारण सिद्धूचे पाकिस्तानशी संबंध आहेत आणि अशा परिस्थितीत ते मुख्यमंत्री झाल्यास देशाच्या सुरक्षेसाठी मोठा धोका निर्माण होईल.
तसेच विश्वासात न घेता कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक गुप्तपणे बोलवणे हा त्याचा अपमान असल्याचे सांगत कॅप्टन अमिरिंदर सिंग म्हणाले की, त्यांनी सात वेळा विधानसभा निवडणुका आणि दोन वेळा लोकसभा निवडणुका जिंकल्या आहेत. मात्र सिद्धू यांनी ‘सुपर सीएम’सारखे वागल्यास पक्ष काम करू शकणार नाही, नवनिर्वाचित मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी हे सुशिक्षित आहेत, मात्र त्यांना गृह खात्याचा अनुभव नाही, परंतु तो आवश्यक आहे, कारण पंजाबची पाकिस्तानसोबत ६०० किलोमीटरची सीमा असून तिकडून गुप्तपणे शस्त्रे आणि औषधे येतात.