इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अंगावर महिलेचे कपडे आणि मागच्या बाजूने हात बांधलेल्या अवस्थेत एका बँक कर्मचाऱ्याचा मृतदेह पंजाबमधील लुधियाना येथे सापडला आहे. अत्यंत संशयास्पद स्थितीमध्ये आढळलेल्या या मृतदेहामुळे शंकाकुशंकांना उधाण आले आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये संशयास्पद स्थितीमध्ये मृतदेह आढळण्याचे प्रमाण वाढले आहे. क्राइम स्टोरीज, वेज सीरिज पाहून वेगवेगळ्या मार्गांनी गुन्हे घडताहेत. या पार्श्वभूमीवर लुधियाना येथे एका बँक कर्मचाऱ्याचा आढळलेला मृतदेह अनेकांसाठी धक्कादायक ठरला आहे. पंजाबमधील लुधियाना येथे एका बँक मॅनेजरचा गळफासाला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला आहे. या बँक मॅनेजरचे हात मागच्या बाजूने बांधलेले होते. तसेच त्याच्या शरीरावर लेडिज अंडरगार्मेट परिधान केलेल्या होत्या.
या घटनेनंतर मृताच्या नातेवाईकांनी घातपाताच्ची शक्यता वर्तवली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले आहेत. तसेच आजूबाजूच्या लोकांकडे चौकशी केली आहे. त्याबरोबरच आजूबाजूचे सीसीटीव्ही तपासून त्यातून पुरावे शोधले जात आहेत. ही घटना अमरनगर परिसरात घडली. लुधियाना पोलिसांनी सांगितले की, सिनियर बँक मॅनेजर गेल्या दीड वर्षांपासून एकटा राहत होता. सकाळी जेव्हा तो आपल्या खोलीतून बाहेर आला नाही तेव्हा त्याच्या घरमालकाने अनेकदा घराचा दरवाजा ठोठावला. मात्र तरीही काही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर घरमालकाने त्या भागातील नगरसेवक गुरदीप सिंग निंटू आणि इतर लोकांना माहिती दिली.
तीन दिवसांपूर्वी वाढदिवस
डिव्हिजन नंबर २ पोलिस स्टेशनचे एसएचओ इन्स्पेक्टर अमृतपाल सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबीयांच्या उपस्थितीत पोलिसांना दरवाजा तोडला. तेव्हा बँक मॅनेजर विनोद मसीह यांचा मृतदेह छतावर लटकलेल्या अवस्थेत सापडला. त्याचे हात मागे बांधलेले होते. शरीरावर लेडिज अंडरगार्मेंट होते. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने फॉरेंसिक टिमला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे तीन दिवसांपूर्वीच विनोदचा जन्मदिवस होता.
Punjab Bank Employee Murder Death