इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पंजाबमधील जनतेचे कल्याण करण्याऐवजी मुख्यमंत्री भगवंत मान सरकारने 60 दिवसांत 38 कोटी रुपये जाहिरातींवर खर्च केले आहेत. आम आदमी पक्ष पंजाबच्या करदात्यांच्या पैशाचा वापर पंजाबबाहेरील राज्यांमध्ये निवडणूक फायद्यासाठी करत आहे. हा पंजाब आणि तेथील जनतेचा विश्वासघात आहे, असा आरोप काँग्रेस नेते परगट सिंह यांनी पुराव्यानिशी पंजाबच्या भगवंत मान सरकारवर हल्लाबोल केला आहे.
विरोधी पक्षांनी भगवंत मान सरकारवर यापूर्वी निशाणा साधला होता. राज्याची तिजोरी भरण्याचा दावा करून सत्तेत आलेली ‘आप’च ती रिकामी करण्यात व्यस्त असल्याचे सांगण्यात आले. पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष अमरिंदर सिंग, राजा वाडिंग, काँग्रेस आमदार सुखपाल खैरा आणि भाजप नेते मनजिंदर सिरसा यांनी याबाबत मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर प्रश्न उपस्थित केले होते.
काँग्रेस आमदार सुखपाल खैरा यांनी आरटीआय माहितीची प्रत ट्विट केली होती. ते म्हणाले होते की, केवळ एप्रिल महिन्यातच 24 कोटी रुपये जाहीरात व प्रसिद्धीवर खर्च करण्यात आले. अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान यांनी अशा प्रकारे त्यांनी पंजाबची तिजोरी भरण्याचे की खाली करण्याचे आश्वासन दिले होते.
एक आमदार, एक पेन्शनमुळे योजनेमुळे सरकार एका वर्षात फक्त 8 कोटी वाचवेल आणि महिनाभरात एवढा खर्च होईल, असे खैरा म्हणाले. केजरीवाल आणि भगवंत मान नागरिकांच्या पैशाचा स्वप्रचारासाठी दुरुपयोग करत असल्याचे खैरा म्हणाले. त्याचवेळी भाजप नेते मनजिंदर सिरसा म्हणाले होते की, आम आदमी पार्टीच्या सरकारने गेल्या 3 महिन्यांत 9 हजार कोटींचे कर्ज घेतले. केवळ एप्रिल महिन्यातच 24.40 कोटी रुपये सरकारच्या प्रसिद्धी आणि जाहिरातींवर खर्च करण्यात आले.
आतापर्यंत पंजाबमधील एकाही महिलेला महिन्याला 1000 रुपये दिले गेले नाहीत. वीज आणि पाण्यावर कोणतेही अनुदान दिले नाही. सीएम भगवंत मान यांनी उत्तर द्यावे , जनतेचे कामच होत नाही, मग प्रसिद्धी कशाची? हा विकास नसून केजरीवालांचा दिल्लीचा भकास नमुना आहे, असेही सिरसा म्हणाले.
Punjab AAP Bhagwant Mann Government Advertisement Expenses