चंदीगड – नवज्योत सिंग सिध्दू यांनी पंजाब काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे पुन्हा एकदा पंजाबमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पंजाबमध्ये नवीन मंत्र्यांचे खातेवाटप झाल्यानंतर काही तासानंतर सिध्दू यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधीं यांना राजीनामा पाठवला आहे. या राजीनाम्यामागे खातवाटप हे कारण असल्याचे बोलले जात आहे. राहुल गांधींनी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्याशी बोलून हे खाते वाटप ठरवले. त्यात नवज्योतसिंग सिध्दू यांना विश्वासात घेतले नाही. त्यांना बैठकीलाही बोलावले नाही. त्यामुळे सिध्दू प्रचंड नाराज झाले. हा राजीनामा देतांना त्यांनी मात्र काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
— Navjot Singh Sidhu (@sherryontopp) September 28, 2021