चंदीगड – पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची चरणजीत सिंह चन्नी यांनी आज शपथ घेतली. त्यांच्याबरोबर ओ.पी. सोनी व सुखजिंदर रंधावा यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. राजभवन येथे झालेल्या या कार्यक्रमात राज्यपाल बनवारीलाल पुरोहीत यांनी गोपनीयतेची शपथ दिली.
कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसने मुख्यमंत्रीपदासाठी चरणजीत सिंह चन्नी यांचे नाव कालच निश्चित केले होते. त्यानंतर आज हा शपथविधी सोहळा पार पडला. काल मुख्यमंत्रीपदासाठी सुखजिंदर सिंह रंधावा यांचे नाव जवळपास निश्चित होते. पण, चन्नी यांच्या नावावर काँग्रसने शिक्कामोर्तब केल्यानंतर आता त्यांना मंत्रीमंडळात स्थान देण्यात आले आहे. त्यांना उपमुख्यमंत्री करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.