बंगळुरु – कन्नड सुपरस्टार पुनीत राजकुमारचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्यानंतर एका चाहत्याने आत्महत्या केली तर तर इतर दोन चाहत्यांचे कार्डिअॅक अरेस्टमुळे निधन झाले आहे. आत्महत्या करणारा बेळगाव जिल्ह्यातील अथानी गावांतील असून त्याचे नाव राहुल गादिवादारा असे आहे. गादिवादारा याने आधी पुनित यांच्या प्रतिमेची पूजा केली. फूल आणि हार घालून फोटो सजवला. त्यानंतर आपल्या घरात गळफास घेतली. बेळगावमधील शिंदोली गावातील परशुराम देमन्ना यांचंही हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले तर चामराजनगर जिल्ह्यातील मारो गावातील ३० वर्षीय मुनियप्पाचे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.
शुक्रवारी छातीत दुखत असल्यामुळे बंगळुरुच्या विक्रम रुग्णालयात पुनीत राजकुमारचे दाखल करण्यात आले होते. पण, येथेच उपचार घेत असतांना त्याचा मृत्यू झाला. पुनित राजकुमार यांचे अकाली जाणे काही चाहत्यांना जिव्हारी लागल्यामुळे या तीन घटना झाल्या आहे. पुनित यांच्या मृत्यूची माहिती मिळताच सर्व चाहते रुग्णालयाबाहेर जमा झाले होते. पुनीतने आपल्या करिअरची सुरुवात बालकलाकार म्हणून केली होती. ‘सुवरत्थान’ हा चित्रपट याच वर्षी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी त्याच्या अभिनयाचे कौतुकही केले होते. हाच चित्रपट त्यांच्या आयुष्यातील शेवटचा चित्रपट ठरला. पुनीत राजकुमारला अनेक पुरस्कार मिळाले आहे. त्याला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे