मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सोनी टीव्हीवरील डान्स रिअॅलिटी शो ‘इंडियाज बेस्ट डान्सर २’ची विजेती पुण्याची सौम्या कांबळे ही ठरली आहे. अत्यंत उत्कंठावर्धक झालेल्या ग्रँड फिनालेमध्ये सौम्याने बाजी मारली. या अंतिम सोहळ्यात तिने जबरदस्त परफॉरमन्स केला.
ग्रँड फिनालेमध्ये पाचही स्पर्धकांनी अत्यंत तडाखेबाज सादरीकरण केले. सगळ्यांना मागे टाकत सौम्याने ‘इंडियाज बेस्ट डान्सर २’ ची ट्रॉफी आणि धनादेश जिंकला. या शोचे सूत्रसंचालन मनीष पौलने केले. तर, अत्रिनेत्री मलाईका अरोरा, टेरेंस लुईस, आणि गीता कपूर हे प्रशिक्षक होते. सौम्याला बक्षिसाच्या रुपात तब्बल १५ लाख रुपये रोख, मारुती सिलेरिओ ही कार आणि अन्य गिफ्ट मिळाले.
फिनालेच्यावेळी अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली. ‘इंडियाज गॉट टालेंट’च्या प्रशिक्षक अभिनेत्री शिल्पा शेट्टी, बादशाह आणि मनोज मुन्तसीर सुद्धा उपस्थित होते. याचबरोबर गायक मिका सिंग आणि कोरिओग्राफर धर्मेश यांनीही स्पर्धकांच्या सादरीकरणाला दाद दिली.
https://twitter.com/SonyTV/status/1480241496838205440?s=20
विशेष म्हणजे, सौम्याला तिच्या वडिलांनी नृत्यासाठी नकार दिला होता आणि आज तिने राष्ट्रीय पातळीवरील रिअॅलिटी शोमध्ये पहिला क्रमांक पटकावला. ही बाब बघून किच्या वडिलांचा ऊर भरुन आला. त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले आणि मला सौम्याचा अभिमान असल्याचे सांगितले. सौम्या अवघ्या १६ वर्षांचीच आहे.