पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सुमारे दोन वर्षांपूर्वी कोरोनाने राज्यभरात हाहाकार उडवला होता. आता मुंबईत गोवरने थैमान घातले असताना पुण्यात झिका विषाणू पसरल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पुण्यात एक झिका व्हायरसचा रुग्ण आढळला आहे. झिका विषाणू प्रामुख्याने एडीस डासांच्या प्रजातीमुळे पसरतो. झिका विषाणूची लागण झालेल्या व्यक्तीचे रक्त पिल्याने डासांना विषाणूची लागण होते.झिका व्हायरसमुळे ८० टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे आढळून येत नाहीत.झिका व्हायरसवर अद्याप कोणतीही लस उपलब्ध नाहीत, तसेच कोणतेही विशिष्ट उपचार उपलब्ध नाहीत.
पुणे शहरात एका ६७ वर्षीय व्यक्तीला झिका व्हायरसची लागण झाली आहे. त्यांना जहांगीर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सुधारत आहे. सदर व्यक्ती पुण्यातील बावधन परिसरातील रहिवासी आहे. जपानी मेंदूज्वरानंतर झिका व्हायसरचा रुग्ण आढळल्याने महापालिकेचा ताण वाढण्याची शक्यता आहे. झिका व्हायरसची लक्षण आढळली त्याच्या घरांतील इतर सदस्यांचे सर्वेक्षण करण्यात आले असून एकही संशयित रुग्ण आढळलेला नाही. या भागातही घरोघरी सर्वेक्षण करण्यात आले असून त्या भागात एडीस डास उत्पत्ती आढळलेली नाही. तसेच या भागात धूरफवारणीही करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे हा रुग्ण मूळचा नाशिक जिल्ह्यातील असून दि. ६ नोव्हेंबरला तो पुण्यात आला होता. त्याच्यावर दि. १६ नोव्हेंबरला उपचार सुरू करण्यात आले. त्याआधी तो ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सूरतला गेला होता. दरम्यान या पार्श्वभूमीवर पुणे शहर आणि परिसरातील सर्वेक्षण अधिक गतिमान करण्यात आले आहे. सदर रुग्णाला ताप, खोकला, थकवा आणि सांधेदुखीचा त्रास होता. त्यामुळे या कारणांसाठी बाह्यरुग्ण विभागात वैद्यकीय सल्ल्यासाठी हा व्यक्ती आला होता. त्यानंतर या रुग्णाची तपासणी करण्यात आली. खाजगी प्रयोगशाळेत रुग्ण दि. १८ नोव्हेंबर झिका बाधित असल्याचे सिद्ध झाले.
झिका विषाणूचा संसर्ग हा डासांच्या एडीज प्रजातीद्वारे पसरतो. मात्र, तीन महिन्यांच्या गरोदर महिलेस हा संसर्ग झाल्यास बाळामध्ये व्यंग येण्याची शक्यता असते. बाळांमध्ये मायक्रोसेफॅली हा दुर्मिळ दोष निर्माण होऊ शकतो. झिका विषाणूची लागण झालेल्या व्यक्तीचे रक्त पिल्याने डासांना विषाणूची लागण होते. त्यानंतर ते डास इतरांना चावल्याने विषाणू पसरतो. लैंगिक संबंधांमधूनही हा व्हायरस पसरू शकतो. तसंच, ब्लड ट्रान्सफ्युजनमधूनही झिका व्हायरस पसरण्याची शक्यता असते. झिकामुळे रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे आढळून येत नाहीत. तर, इतर, रुग्णांमध्ये ताप, अंगदुखी, डोळे येणे, अंगावर पुरळ उठणे, सांधेदुखी अशी लक्षणे आढळतात. डास चावल्यानंतर साधारणतः आठवड्यानंतर झिका व्हायरसची लक्षणे आढळून येतात.
झिका व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांला डॉक्टर ताप किंवा डोके दुखीसाठीच्या औषधाची शिफारस करतात. तसंच, अधिक आराम करण्याचा सल्ला देतात. साधारण पणे डास हे आंधाऱ्या जागी, ओलसर ठिकाणी किंवा साचलेल्या पाण्यात असतात. त्यामुळे अशा जागा वेळोवेळी स्वच्छ करा. तसेच, रात्री झोपताना मच्छरदाणीचा उपयोग करा. हा व्हायरस जीवघेणा नसला तरी ही काळजी घ्या. विशेषतः गर्भवती महिलांना काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य तज्ज्ञ करत आहेत.
४ वर्षीय बालकाला जपानी मेंदूज्वर
मुंबईत बालकांना गोवराची लागण झाल्याने सर्व वैद्यकीय यंत्रणा त्रस्त झाली असताना आता पुण्यात वडगाव शेरी परिसरातील ४ वर्षाच्या बालकाला जॅपनीज एन्सेफलायटिस म्हणजेच जपानी मेंदूज्वर या आजाराचे निदान झाले आहे. हा विषाणूजन्य आजार आहे. या मुलाला दि. ३ नोव्हेंबर रोजी ससून रुग्णालयातील बालरुग्ण अतिदक्षता कक्षात दाखल करण्यात आले होते. त्यामुळे महापालिकेची आरोग्य खडबडून जागी झाली असून याबाबत वरिष्ठ पातळीवर बैठका सुरू आहेत. विशेष म्हणजे पुणे महापालिकेच्या क्षेत्रात पहिल्यांदाच या आजाराचा रुग्ण आढळला असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे त्याला रोखण्यासाठी पलिकेकडून तयारी सुरु करण्यात आली आहे. या आजारामध्ये नेमके निदान होत नसले तरी डोकेदुखी अशक्तपणा सारखा त्रास होतो या बालकाला देखील अशाच प्रकारे त्रास झाल्याची आढळून आले आहे.
Pune Zika Virus Patient Found Health Alert