पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर व परिसरात महिलांवरील अत्याचारांमध्ये वाढ झालेली दिसून येते. त्यातच विनयभंग बलात्कार, मारहाण, शिवीगाळ असे प्रकार वाढल्याने महिला वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हडपसर भागात एका डाॅक्टर महिलेचा विनयभंग करून पतीला जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली. मांजरी भागातील अतुल वसंत घुले (वय ४२ ) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
याबाबत एका डाॅक्टर महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गेल्या दोन-तीन महिन्यांमध्ये पुणे आणि परिसरात असे अनेक गैरप्रकार घडल्याने पोलिसांचा गुन्हेगारांवरील वाचक कमी झाला की काय अशी चर्चा सुरू झाली आहे हडपसर परिसर घडलेल्या प्रकाराबद्दल सांगण्यात येते की, तक्रारदार महिलेचा मांजरी भागात दवाखाना आहे. आरोपी घुले याची दवाखान्याशेजारी खाणावळ आहे. खाणावळीत व दवाखान्यात कोणी नसताना घुले हा सारखा दवाखान्यात डोकावत होता.
दरम्यान, आरोपी घुले उपचाराचा बहाणा करून दवाखान्यात येत असे. त्याच वेळी घुले याने डाॅक्टर महिलेशी लगट करण्याचा प्रयत्न करुन लज्जास्पद वर्तन केले. घुले याने डाॅक्टर महिलेचा पाठलाग करून तिला जिवे मारण्याची धमकी दिली. घाबरलेल्या डाॅक्टर महिलेने पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करत आहेत. या प्रकारामुळे परिसरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Pune Women Doctor Molestation Manjri Crime